गुहागर ग्रामपंचायत कर्मचारी संघ विजेता तर महापुरुष पोलिस कर्मचारी संघ उपविजेता
गुहागर, ता. 24 : दैनंदिन कामकाजात व्यस्त असून जीवनाला विरंगुळा व्हावा, तसेच क्रिकेट खेळताना एकमेकांची ओळख व्हावी व क्रिकेटचा आनंद घ्यावा या उद्देशाने शिवजयंती निमित्त गुहागर तालुका कर्मचाऱ्यांतर्फे दुसऱ्या पर्वात ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा जानवळे फाटा येथील मैदानावर नुकतीच संपन्न झाली. Taluka Staff Cricket Tournament
या स्पर्धेत ग्रामपंचायत कर्मचारी गुहागर क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला रोख ७ हजार रुपये व छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा बक्षीस देण्यात आली. या स्पर्धेत महापुरुष पोलिस कर्मचारी गुहागर क्रिकेट संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. त्यांना 5 हजार रुपये रोख व शिवाजी महाराज प्रतिमा बक्षीस देण्यात आली. स्पर्धेतील उत्कृष्ट क्रिकेट फलंदाज म्हणून सुशांत कुंभार व उत्कृष्ट क्रिकेट गोलंदाज राजा धनावडे यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Taluka Staff Cricket Tournament
ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत गुहागर शिक्षक कर्मचारी क्रिकेट संघ, पाटपन्हाळे हायस्कूल शिक्षक क्रिकेट संघ, महावितरण क्रिकेट संघ, बँक व पतपेढी क्रिकेट संघ, गुहागर ग्रामपंचायत कर्मचारी क्रिकेट संघ, एसटी कर्मचारी क्रिकेट संघ, महापुरुष पोलिस कर्मचारी गुहागर क्रिकेट संघ, एस. टी. वर्कशॉप क्रिकेट संघ हे आठ संघ सहभागी झाले होते. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन तळवली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. थरकार यांच्या हस्ते करण्यात आले. Taluka Staff Cricket Tournament
स्पर्धेतील विजेत्या गुहागर ग्रामपंचायत कर्मचारी क्रिकेट संघाला कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांच्यातर्फे व उपविजेत्या क्रिकेट संघाला गुहागर भारतीय जनता पार्टीतर्फे बक्षीस देण्यात आले. तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमा शृंगारतळीमधील श्रीगणेश कृपा ज्वेलर्सचे मालक जय गुहागरकर यांच्यातर्फे देण्यात आल्या. बक्षीस वितरण समारंभासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत, मुख्याध्यापक पाटील, मुख्याध्यापक श्री. गोरीवले, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बेलवलकर, प्रा. नेरले, शिक्षक भिडे आदी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये पंच म्हणून शैलेश कोलकांड व सलमान शेख यांनी काम पाहिले. Taluka Staff Cricket Tournament