गुहागर, ता. 24 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून वाशिष्टी दूध प्रकल्पाला भेट देण्यात आली. कोकणातील रोजगाराचे साधन बनलेल्या वाशिष्टी दूध प्रकल्पास विद्यार्थ्यांना भेट देऊन त्या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली आणि भविष्यात रोजगाराची संधी आपल्या कोकणातच कशी होऊ शकते याची माहिती मिळवली. Patpanhale College visit to milk project
![Patpanhale College visit to milk project](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/gn2411.jpg)
![Patpanhale College visit to milk project](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/gn2411.jpg)
या प्रकल्पामध्ये एकूण कार्य कसे चालते तसेच दूध आणि दुग्ध उत्पादने कोणत्या प्रकारचे आहेत तसेच यामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्ठी दूध प्रकल्पाचा प्रवास कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा घेतला. दुग्ध उत्पादने आणि दुधाला मोठ्या प्रमाणात स्पर्धा असताना दुधाचे मार्केटिंग कशा प्रकारे केले जाते याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक मगदूम साहेब यांनी दिली. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत प्रकल्पाचा प्रवास त्यांनी थोडक्यात सांगून या प्रकल्पाचे भविष्यातील नियोजन कसे असणार आहे याची माहिती दिली. या प्रकल्पाचा आधारभूत घटक म्हणजे शेतकरी आहे त्यांना कशाप्रकारे मदत केली जाते याची माहिती दिली. यावेळी या प्रकल्पाचे संस्थापक प्रशांत यादव यांची विद्यार्थ्यांशी भेट झाली. Patpanhale College visit to milk project
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/adv-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/adv-1.jpg)
या प्रकल्पाला भेट देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी कौंढे येथील होळकर बंधूंच्या आधुनिक अशा पद्धतीच्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने चालवले जाणाऱ्या दुग्ध प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पामध्ये एकूण शंभर गायी आणि म्हैशी आहेत. या प्रकल्पामध्ये दररोज सहाशे लिटर दूध तयार होते. हा प्रकल्प त्यांनी कशाप्रकारे उभा केला याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यानी शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला न जाता आपल्या गावातच रोजगारांची संधी कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकते आणि चांगले पैसे कसे मिळवू शकतो हे पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या बरोबर वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एस एस खोत आणि ग्रंथपाल धनंजय गुरव उपस्थित होते. Patpanhale College visit to milk project