निवास, शिक्षण, बाजारपेठ, आरोग्य सुविधेला प्राधान्य
गुहागर, ता. 22 : ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुख्यालयी रहावे असा शासनाचा आदेश आहे. तरीही काही ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येत असून गुहागर तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांचे मुख्यालय हे शृंगारतळी असल्याचे समोर येत आहे. त्यातच तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या पाहता ग्रामसेवकांना समाधानकारक सेवा बजावण्यास मिळत आहेत. त्यामुळे कामाचा कोणताही ताण नसताना असे ग्रामसेवक मुख्यालयी का राहत नाहीत, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. Residence of Guhagar village servants
गुहागर तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती आहेत. ग्रामसेवकांची एकूण मंजूर पदे ६१ असून सध्या ४३ कार्यरत आहेत. म्हणजेच केवळ १८ पदे रिक्त आहेत. वास्तविक काही तालुक्यात ग्रामसेवकांची संख्या पाहिली असता त्यांच्याकडे ग्रामपंचायती जास्त असून ग्रामसेवकांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. याउलट स्थिती गुहागर तालुक्यात आहे. केवळ २० टक्के ग्रामसेवकांकडेच दोन ग्रामपंचायतींचा कारभार असून उर्वरित ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी एक ग्रामसेवक आहे. Residence of Guhagar village servants
गुहागर तालुक्यात बहुतांशी ग्रामसेवक हे आपल्या कार्यक्षेत्रात रहात नाहीत. गुहागर शहराची खारी हवाही त्यांना मानवत नाही. त्यामुळे असंख्य ग्रामसेवक हे शृंगारतळी येथे वास्तव्याला आहेत. जणू हेच त्यांचे मुख्यालय आहे, असे त्यांना वाटत असते. शृंगारतळी ही गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी. मध्यवर्ती ठिकाण व मोठी बाजारपेठ. निवासी व्यवस्था, अपार्टमेंट, शाळा, महाविद्यालय यांची सोय असल्याने बहुतांश नोकर वर्ग शृंगारतळीतच राहतो. त्यामुळे तालुक्यातील ग्रामसेवकांनाही शृंगारतळी हे आपले मुख्यालय वाटते. Residence of Guhagar village servants
गुहागर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ व गावेही दुर्गम असल्याने मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याची नेहमीची तक्रार ग्रामसेवकांकडून ऐकायला मिळते. त्यामुळे नेटवर्कचे निमित्तही ग्रामसेवकांना पुढे करणे सोपे जाते. मात्र, मुख्यालयी राहिल्यास गावच्या सातत्याने येणाऱ्या कटकटींना त्यांना आँफड्युटीही सामोरे जावे लागते. सरपंच, सदस्य किंवा ग्रामस्थ यांच्याकडून काहीना काही कामे अचानक उद्भवतात त्यामुळे ग्रामसेवकांची डोकेदुखी वाढते. याउलट शृंगारतळीत राहिल्यास ग्रामसेवकांना नेटवर्कची चिंता भेडसावत नाही मात्र, ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने तेथील लोकांना संपर्क साधणे कठीण होते. त्यांची पंचाईत होते. त्यामुळे ग्रामसेवकांना शृंगारतळी अधिक सुरक्षित वाटत असल्याचे बोलले जात आहे. Residence of Guhagar village servants