रस्त्याची रूंदी ३० ऐवजी १८ मीटर; नागरिकांना दिलास
गुहागर, ता. 23 : गुहागर नगरपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा नुकताच राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन शहरातील बाजारपेठेमधून जाणाऱ्या रस्त्याची रूंदी ३० ऐवजी १८ मीटर होणार असल्याने बाजारपेठेतील नागरिकांना दिलास मिळणार आहे. मात्र उर्वरित ३० मीटरचा रस्त्यात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा रस्ता रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचा भाग असल्याने या रस्त्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. Road in Guhagar Bazar Pethe will be built
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/adv-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/adv-1.jpg)
गुहागर नगरपंचायतीची स्थापना होऊन ११ वर्ष झाली आहेत. रखडलेल्या विकास आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नगर पंचायतीच्या प्रस्तावित नगररचना आराखड्यासाठी १ हजार ४०० हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली असून या आराखड्यात बदल करण्याचे काम आता नगररचनाकार कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी हा सुधारित आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. Road in Guhagar Bazar Pethe will be built
काही महिन्यांपूर्वी गुहागर नगरपंचायतीचा नवीन प्रस्तावित आराखडा नगरपंचायतीने प्रसिद्ध केला होता. मात्र या आराखड्यास नागरिकांकडून तब्बल १ हजार ४०० हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. या सर्व हरकती गुहागर शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाबतीतच होत्या. हा रस्ता बाजारपेठेतून जात असल्यामुळे बाजारपेठ नष्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे या आराखड्याला नागरिकांचा विरोध निर्माण झाला होता. हरकतींची याबाबत सुनावणी झाल्यानंतर यासाठी स्थापन समितीने प्रस्तुत आराखड्यात बदल केला आहे. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी स्थापन समितीमध्ये माजी नगर रचनाकार तसेच नगररचनाकार विभागाचे माजी संचालक आणि या परिसरातील वास्तुविशारद यांचा समावेश करण्यात आला होता. या सुनावणीनंतर नगरपंचायतीच्या आधीच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. Road in Guhagar Bazar Pethe will be built