• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अखिल शिक्षक संघाच्यातर्फे दिनदर्शिका प्रकाशन

by Manoj Bavdhankar
February 19, 2024
in Guhagar
45 1
0
Publication of Calendar by Teachers Union
89
SHARES
253
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : विद्यार्थी गुणगौरव गुणवत्ता क्षेत्र व शिष्यवृत्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते नुकतेच जानवले येथील विशेष कार्यक्रमांमध्ये संपन्न झाले. Publication of Calendar by Teachers Union

सदर दिनदर्शिका चे प्रकाशन शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी गळवे साहेब, केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ, केंद्रप्रमुख खरडे साहेब, केंद्रप्रमुख तुकाराम निवाते, केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर, अखिलचे शिक्षक नेते चंद्रकांत पागडे, अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, संघाचे अध्यक्ष दीपक साबळे, शिक्षक नेते कैलास शार्दुल, गुहागर तालुका प्राथमिक समितीचे सरचिटणीस नरेंद्र देवळेकर, अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, अखिल चे पदाधिकारी सुधीर गोणबरे, सुधीर कांबळे, पल्लवी डिंगणकर, दिनेश जानवळकर, पंचायत समिती आय ई डी मोहिते मॅडम या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. Publication of Calendar by Teachers Union

त्यावेळी बोलताना विस्ताराधिकारी गावणकर साहेब म्हणाले की, शिक्षण क्षेत्रामध्ये अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे कामकाज अतिशय गौरवास्पद आहे. गुणवत्ता विकासासाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन परीक्षा तसेच नवोदय स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी मध्ये विशेष प्राविण्य केलेले विद्यार्थी, नासा इसरो मध्ये निवड झालेले विद्यार्थी, निवृत्त शिक्षक, कर्मचारी, अधिकारी यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करून गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमात  कैलास शार्दुल, नरेंद्र देवळेकर, दीपक साबळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. Publication of Calendar by Teachers Union

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPublication of Calendar by Teachers UnionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share36SendTweet22
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.