• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुनील बेंडखळे यांना ‘कलागौरव’ पुरस्कार

by Guhagar News
February 14, 2024
in Ratnagiri
77 1
0
'Art Gaurav' award to Sunil Bendkhale

लांजा : वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे सुनील बेंडखळे यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करताना आमदार राजन साळवी. सोबत सहकलाकार

151
SHARES
431
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

‘कोकणचा साज..’चे तात्या गावकर; वेरवलीतील शिक्षण मंडळातर्फे गौरव

रत्नागिरी, ता. 14 : लोकनाट्य आणि कला क्षेत्रातील विविध कार्याची दखल घेऊन लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ, वेरवली बुद्रुक या शिक्षण संस्थेतर्फे ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’चे सूत्रधार आणि मुख्य कलाकार तात्या गावकर ऊर्फ सुनील बेंडखळे यांना जिल्हास्तरीय ‘कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘Art Gaurav’ award to Sunil Bendkhale

वेरवली बुद्रुक येथील श्रीराम विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. समर्थकृपा प्रॉडक्शन निर्मित ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने नुकतेच चारशे प्रयोग पूर्ण केले आहेत. कोकणातील जाखडी, नमन, भजन आदी लोककलांच्या सादरीकरणातून मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्हीची अतिशय उत्तम सांगड घालणारे हे लोकनाट्य रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली लोप पावत चाललेली मूळ लोककला पुन्हा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतानाच कोकणातील अनेक वास्तवांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न या लोकनाट्याद्वारे केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यासह मुंबईत अनेक ठिकाणी लोकनाट्याचे अनेक प्रयोग सादर झाले आहेत. याशिवाय सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून तिवरे धरणग्रस्तांना मदत, जिल्ह्यातील विविध शाळांच्या मदतीसाठी, तसेच हलाकीचे जीवन जगणाऱ्या लोककलावंतांकरिता या लोकनाट्याचे प्रयोग सादर केले आहेत. त्यातून अनेक गरजवंतांना मदतीचा हात दिला आहे. मुलुंड-मुंबईत पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात या चमूला गौरविण्यात आले. ‘Art Gaurav’ award to Sunil Bendkhale

मुख्य सूत्रधार सुनील बेंडखळे यांचे या साऱ्यामध्ये मोलाचे योगदान आहे. विविध सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात. त्यांच्या कलाक्षेत्रातील, तसेच सामाजिक कार्याची दखल घेऊन वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे त्यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या वेळी बेंडखळे यांनी संगमेश्वरी बोलीतून मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली. या पुरस्कार सोहळ्याला बेंडखळे यांचे सहकलाकारही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश डोळस यांनी केले, तर विनोद बंडगर व सचिन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ‘Art Gaurav’ award to Sunil Bendkhale

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.