गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत तवसाळ तांबडवाडी शाळेची अनुष्का घाणेकर हिने उंच उडी गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. Anushka Ghanekar’s success in sports
अनुष्का घाणेकर हिचे दि. 15 व 16 फ्रेब्रुवारी रोजी डेरवण येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. याचे श्रेय अनुष्काने तीचे आई वडील, शाळेचे मुख्याध्यापक अंकुश मोहिते व सह शिक्षिका तनुजा गडदे, राजेश्वरी वेल्हाल, शा. व्य.समितीचे अध्यक्ष रमेश कुरटे, उपाध्यक्ष वैष्णवी निवाते, शिक्षण प्रेमी विजय मोहिते, माजी सरपंच नम्रता निवाते, समस्त ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांना दिले आहे. Anushka Ghanekar’s success in sports