सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. चा पुढाकार
गुहागर, ता. 12 : वसई ते भाईंदर वेळेतील रस्ते मार्गाने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु येथील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. वसई ते भाईंदर दरम्यान वसई खाडीमध्ये सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. च्या फेरीबोट सेवेचा दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. राज्य शासनातर्फे शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी दिली. Vasai to Bhayandar Ferry Boat
कोकणचा पर्यटनातून विकास करण्यासाठी सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. तर्फे दाभोळ – धोपावे, जयगड – तवसाळ, वेश्वी – बाग मांडले, परचुरी – फरारे याठिकाणी पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांसाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवेमुळे कोकणातील सर्व पर्यटन स्थळे जवळ आली आहेत. तसेच वेळ आणि पैशांची बचत होते. त्यामुळे बहुतांशी पर्यटक या फेरीबोट सेवेचा लाभ घेऊन प्रवास करताना दिसतात. समुद्र किनाऱ्यांचा विकास आणि जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून वसई खाडीमध्ये वसई – भाईंदर अशी फेरीबोट सेवा राज्य शासनातर्फे सुरू करण्यात येत आहे. Vasai to Bhayandar Ferry Boat
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/adv.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/adv.jpg)
या सेवेमुळे रस्तेमार्गे सुमारे दीड तासांचा लागणारा प्रवासाचा वेळ १५ मिनिटांवर येणार आहे. ही सेवा दिवाळीत सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेरीबोट सुरू होण्यास विलंब झाला. वसई ते भाईंदर रस्त्यामार्गे येताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत होता. हे अंतर साधारण ३८.२० किलोमीटर इतके आहे. त्यासाठी सव्वा ते दीड तासांचा कालावधी लागतो. मात्र, या फेरीबोटीमुळे हे अंतर अवघ्या ३.५७ किलोमीटर अंतरावर येणार आहे. केवळ १५ मिनिटात प्रवाशांना वसई ते भाईंदर गाठता येणार आहे. Vasai to Bhayandar Ferry Boat
सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. चे चेअरमन डॉ. चंद्रकांत मोकल व कार्यकारी व्यवस्थापक डॉ. योगेश मोकल यांनी आता मुंबई उपनगरात जान्हवी ही फेरीबोट सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल करत आहेत. या फेरीबोटीतून ४० वाहने आणि १०० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. Vasai to Bhayandar Ferry Boat