• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देवघर-गुहागर दुतर्फा वृक्षलागवडीचा फज्जा

by Ganesh Dhanawade
February 12, 2024
in Guhagar
189 2
1
Plants withered due to lack of water
372
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाण्याअभावी रोपे सुकली तर काही जमीनदोस्त, लागवडीचे तीनतेरा

गुहागर, ता. 12 : गुहागर-विजापूर मार्गावरील देवघर ते गुहागर दरम्यान, झालेल्या रस्ता रुंदीकरणानंतर दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. मात्र, ही लागवड केवळ देखावा ठरली आहे. पाण्याअभावी रोपे सुकून गेली असून काही रोपे सभोवतालचे कुंपण तुटून जमीनदोस्त झालेली पहायला मिळत आहेत. Plants withered due to lack of water

रस्ता रुंदीकरणाला यापूर्वीची दुतर्फा असलेले महाकाय वृक्ष अडथळे ठरलेले असल्याने विसावा देणारी ही झाडे तितकीच महत्वाची होती. मात्र, रुंदीकरणामुळे ही झाडे तोडावी लागली. यामुळे संपूर्ण महामार्ग भकास व ओसाड वाटत होता. यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांच्यासभोवती बांबूच्या काट्या उभ्या करण्यात येऊन नेटची जाळी बांधण्यात आली. या रोपांना टँकरने अधूनमधून पाणीही दिले जात होते. मात्र, ही रोपे अलिकडे सुकून गेलेली दिसून येत आहेत तर काही रोपे जमीनदोस्त झालेली आहेत. तसेच रोपांभोवतीच्या उभ्या काट्या व कापडही गायब झालेली आहेत. या लागवडीत आणखी एक फसवणूक म्हणजे नवीन रोपे लागवड केलेली आहेत असे दाखवून पूर्वीच्या जुन्या जगलेल्या झाडांनाच जाळीचे कापड गुंडाळलेले आहेत. एकूणच लागवड केलेली रोपे जगणार कशी असा सवाल उपस्थित होत आहे. Plants withered due to lack of water

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPlants withered due to lack of waterUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share149SendTweet93
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.