संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत कुडली माटलवाडी शाळेचा आर्यन संतोष माटल याने गोळाफेक गटांमध्ये प्रथम व थाळीफेक या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हा स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. या बक्षीस वितरण समारंभासाठी गटशिक्षणाधिकारी श्रीमती. लीना भागवत, शिक्षण विस्तार अधिकारी रायचंद गळवे, अशोक गावणकर तसेच उपस्थित मान्यवर पदाधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते. Aryan Matal success in sports

आर्यन माटलच्या यशाबद्दल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत मूल्यमापन समितीचे प्रमुख शीर केंद्राचे केंद्रप्रमुख तुकाराम निवाते, पडवे उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर, शीर हायस्कूलचे मुख्याध्यापक दादासाहेब गायकवाड, शीर मुख्याध्यापक अनंत पवार, तवसाळ मुख्याध्यापक संदीप खंडगावकर, तवसाळ तांबडवाडी मुख्याध्यापक अंकुर मोहिते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. Aryan Matal success in sports
तसेच डेरवण या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा स्तरावर सहभागी होण्यास पात्र झाल्याबद्दल चैतनी शेट्ये सरपंच ग्रामपंचायत कुडली, संतोष पावरी उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामसेवक हरीश कुळये तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश वनये, मुख्याध्यापक सुहास गायकवाड, शिक्षक प्रमोदिनी गायकवाड, गणेश वायचाळ, सौरभ कटनाक, सर्व विद्यार्थी, माटलवाडी युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. Aryan Matal success in sports
