प्रमोद शितप यांच्या जन्मदिनी विविध कार्यक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोली गावचा सुपूत्र सद्या मुंबई नालासोपारा पूर्व येथे स्थायिक झालेला गावदेवी गोविंदा पथकाचा संस्थापक, समाज सेवक, टूरीस्ट व्यावसायिक आणि यशस्वी उद्योजक श्री.प्रमोद शितप उर्फ दादा शितप यांच्या जन्मदिनी महिलांसाठी अंकगणित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. Arithmetic competition for women at Nalasopara
या स्पर्धेत सौ.मिताली महेंद्र ठोंबरे, मानसी मंगेश शेडगे, दक्षता ऋषीकेश डिंगणकर, सुषमा शशिकांत गुरव,अन्विता भूवड, लक्ष्मी गुरव, अनुजा गुडेकर, अनिषा विनोद शितप, अमृता अक्षय पागडे, स्वरा राकेश उतेकर, दिपिका दिपक म्हादे, रेश्मा कुंभार, अनिता घाटकर,अपूर्वा जोशी, नम्रता शितप या महिलां स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या अंकगणित स्पर्धेत सौ.रेश्मा शैलेश कुंभार हिने प्रथम क्रमांक पटकावला तर सौ.अमृताअक्षय पागडे हिने व्दितीय क्रमांक पटकावला तर सौ.स्वरा राकेश उतेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. Arithmetic competition for women at Nalasopara

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.अतूल पागडे, श्री.तुषार शेळके, श्री.मयूर नारकर, श्री.प्रणित खराडे यांचे हस्ते गुणपत्रिका व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण श्री.विनोद शितप, श्री.विनोद पाष्टे यांनी केले यावेळी श्री.प्रमोद शितप उर्फ दादा शितप यांचा जन्मदिन केक कापून करण्यात आला त्यानंतर प्रमोद शितप यांना उपस्थित सर्वांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यानंतर सर्व मुलांना खाऊचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. Arithmetic competition for women at Nalasopara
