• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

by Mayuresh Patnakar
February 8, 2024
in Guhagar
86 0
2
Road Safety Week in Patpanhale School
168
SHARES
480
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

गुहागर, ता. 08 : प्रादेशिक परिवहन रत्नागिरी कार्यालय (आरटीओ कार्यालय) तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. यावेळी पाटपन्हाळे विद्यालयातर्फे प्रादेशिक परिवहन रत्नागिरीचे अधिकारी श्री. लोंढे व श्री. पाटील, सद्गुरु मोटार प्रशिक्षण केंद्र, शृंगारतळीचे मालक व संचालक अमिष कदम, प्रतिनिधी राजू महाडीक व प्राध्यापकवृंद यांचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. Road Safety Week in Patpanhale School

प्रादेशिक परिवहन रत्नागिरी कार्यालयाचे अधिकारी श्री. लोंढे, श्री. पाटील यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहबाबत मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षितेचे नियम, अपघात कमी होण्यासाठी चालकांनी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, वाहन चालकांना आवश्यक असणारा वाहन परवाना ( लायसन्स), वाहन चालकांनी करावयाचा हेल्मेटचा वापर, हेल्मेटचे महत्व, वाहनाच्या वेगावर राखावयाचे नियंत्रण व वेगमर्यादा, चालकांनी पाळावयाचे वाहतुकीचे नियम याबाबत न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन ( ज्युनिअर कॉलेजच्या ) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ कार्यालय ) तर्फे चांगले सहकार्य लाभले. Road Safety Week in Patpanhale School

यावेळी मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील, प्रा. जी. डी. नेरले, प्रा. एस.एस. मोरे हे उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयीन (ज्युनिअर कॉलेज ) विद्यार्थ्यांना वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारा परवाना (लायसन्स ), रस्ता सुरक्षितेचे नियम, हेल्मटचे महत्त्व याबाबत प्रादेशिक कार्यालय रत्नागिरीतर्फे चांगली माहिती मिळाली, अशी अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सदर कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. Road Safety Week in Patpanhale School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRoad Safety Week in Patpanhale SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.