गुहागर, ता. 06 : गुहागर समुद्रकिनारी चार ते पाच फुटी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. या मृत डॉल्फिन माशामुळे दुर्गंधी पसरू नये म्हणून गुहागर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या मृत माशाला समुद्रावरती खोल खड्डा खणून पुरण्यात आले. Dead dolphin fish was found on the beach of Guhagar
गुहागर नगरपंचायतीचा लाईफ गार्ड अक्षय लोखंडे हा सकाळी आठ वाजता गुहागर समुद्रावर ड्युटी साठी हजर झाला. त्यावेळी रात्री उशिरा समुद्रातून वाहून आलेला चार ते पाच फुटी मृत डॉल्फिन मासा समुद्रकिनारी त्याच्या नजरेस पडला. अक्षय याने गुहागर नगरपंचायतीचे सुनील नवजेकर यांना याविषयी सविस्तर माहिती दिली. या मृत डॉल्फिन माशामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरू नये व गुहागर वासियांच्या आरोग्यास धोका पसरू नये, म्हणून गुहागर नगरपंचायतीचे गणेश पावसकर, समर्थ भोसले, राजन परकर यांनी समुद्र किनारी खोल मोठा खड्डा खणून डॉल्फिन माशाला पुरून त्याची विल्हेवाट लावली. Dead dolphin fish was found on the beach of Guhagar