• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ शाळेच्या इमारतीची त्वरीत दुरुस्ती करा

by Manoj Bavdhankar
February 6, 2024
in Guhagar
95 1
0
Repair the building of Tavasal School
187
SHARES
535
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

इमारत दुरुस्त न झाल्यास मनसेच्या वतीने उपोषणाचा इशारा

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील मोडकळीस येत असलेल्या शाळेची इमारत त्वरीत दुरुस्त न झाल्यास मनसेच्या वतीने पंचायत समिती समोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गुहागर व गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गुहागर यांना दिले आहे. Repair the building of Tavasal School

निवेदनात म्हटले आहे की, तवसाळ येथील मोडकळीस येत असलेल्या जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ बाबरवाडी येथील शाळेच्या इमारत दुरुस्ती करण्या संदर्भात गुहागर मनसेच्या वतीने दिनांक २६ .१०.२०२३ रोजी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी  यांना निवेदन देण्यात येऊन सुद्धा अद्यापी या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नाही. येत्या काही दिवसात या शाळेची दुरुस्ती न झाल्यास  महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका, पंचायत समिती समोर मनसेचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसतील याची नोंद घ्यावी. Repair the building of Tavasal School

तवसाळ (बाबरवाडी) या शाळेची इमारतीची अवस्था अतिशय बिकट आणि मोडकळीस व दुर्घटनाग्रस्त बनली आहे. सदर इमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे येथे शिकणा-या विद्यार्थ्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तरी आपण प्रत्यक्षात या जागी जावून पाहणी करावी व लवकरात लवकर या इमारतीची दुरुस्ती करावी. अन्यथा आम्हा संघटनेला यामध्ये गांर्भियाने लक्ष घालावे लागेल. येत्या दिवसात आपण कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते पंचायत समितीच्या समोर आम्ही उपोषणाला बसू तसेच पुढील होणा-या महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. या निवेदनाचा अभिप्राय किंवा प्रतिक्रीया मिळावा. यावेळीं उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, सुजित गांधी, किशोर बामणे, संतोष हेगिष्टे, गंगाराम खांबे, महीला सैनिक, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. Repair the building of Tavasal School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRepair the building of Tavasal SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.