गुहागर, ता. 6 : श्रीमंत पेशवे यांचे आमच्या गावात येणे झाले हे आमचे भाग्य आहे. तसेच खलनायिका ठरवलेल्या आनंदीबाईंचा सकारात्मक चेहरा समोर आणून मळणवासीयांचा सन्मान उंचावला आहे. असे प्रतिपादन श्री हरिहरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुमंत भिडे यांनी केले. श्रीमंत पेशव्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. Peshwas were Felicitated at Malan

रविवारी दि. 4 रोजी श्रीमंत पेशवे पुष्करसिंह, सौ. आरती देवी, सौ. आदितीदेवी पेशवा अत्रे , इतिहास तज्ञ मंगेश तेंडुलकर आदी मंडळींनी मळण गावातील आनंदीबाईंचे घर, श्रुंगार तळे, आदी स्थानांना भेट दिली. या दौऱ्यात मळणवासीयांनी पेशवे कुटुंबाचा सत्कार हरिहरेश्वर मंदिरात केला. आनंदीबाईंच्या घराचे ठिकाणी स्मारक तथा पेशव्यांचा इतिहास सांगणारे दालन उभे रहावे. अशी इच्छा यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी गुहागर तालुका ब्राह्मण समाज, खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील इतिहासाच्या प्राध्यापिका सौ रश्मी आडेवर व शिवाजी आडेकर यांनी देखील पेशवे कुटुंबाचा सत्कार केला. Peshwas were Felicitated at Malan

मळणचे सरपंच नारायण गुरव म्हणाले की, पेशव्यांनी बांधलेल्या श्रुंगार तळ्याचे सुशोभीकरण, बाजूला सुंदर बाग बगीचा व्हावा यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे. मात्र तळ्याचे क्षेत्राचा सातबारा नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात सातबारा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. स्मारक व तळ्याचे सुशोभीकरण ही दोन्ही कामे झाल्यास मळणात पर्यटन उद्योग वाढेल. Peshwas were Felicitated at Malan

रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष व ब्राह्मण सहाय्यक संघाचे सल्लागार बाळुशेठ ओक म्हणाले की, पेशवे आणि ब्राह्मण यांचा तिरस्कार करण्याचे उद्योग इंग्रज आणि मुघलांनी सुरू केले. जे आजतागायत सुरू आहेत. मात्र पेशव्यांचा पराभव केल्यामुळेच मराठेशाहीच्या साम्राज्याचा अस्त झाला. ब्रिटिशांना महाराष्ट्रात राज्य करता आले. हा इतिहास समाजासमोर आणला गेला नाही. या कार्यक्रमात गोपाळ गोखले, विवेक गानू, प्रा. सौ. रश्मी आडेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. नीला नातू यांनी पुस्तकाची माहिती दिली. श्रीमंत पेशवा पुष्करसिंह म्हणाले की, आजच्या प्रवासाने आनंद मिळाला. पुर्वजांविषयी गावकऱ्यांना असलेले प्रेम पाहून मन भरून आले. यापुढे आवर्जून मळण येत राहू. ग्रामस्थांच्या मनातील कार्य पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा देतो. Peshwas were Felicitated at Malan
