गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या स्नेहसंमेलनात शाळेतील एकूण 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. Umrath School Annual Reunion Concluded
या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर आणि सुभाष पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व गावातील सर्व वाडी अध्यक्ष वाडी प्रमुख यांचे शाळेचे मुख्याध्यापक नाटेकर सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सरपंच जनार्दन आंबेकर यांनी कार्यक्रमासाठी सहभागी सर्व कलाकारांसाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी मनोगतामध्ये शुभेच्छा दिल्या. तसेच नामदेव पवार यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. Umrath School Annual Reunion Concluded

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे फनी डान्स. सहभागी कलाकारांनी एवढ्या मनमोकळ्या पद्धतीने नृत्य केले की प्रेक्षकांकडून वन्स मोर ची दाद मिळाली. एकंदरीत सुंदर झालेल्या या कार्यक्रमात हार्मोनियमची साथ मुख्याध्यापक नाटेकर सर यांनी दिली. तर तबल्याची साथ अनिल अवेरे यांनी दिली. स्टेज, लायटिंग आणि साऊंड व्यवस्था योगेश कदम यांनी उत्तम केली. या स्नेहसंमेलन कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सफाईदार आणि उत्तम नृत्य केले. नेपथ्य व वेशभूषा अनिल अवेरे सर, प्राची पवार मॅडम आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनी पालक वर्गाच्या सहकार्याने अतिशय उत्तम केली होती. Umrath School Annual Reunion Concluded

सदर वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत कदम, शिक्षण तज्ञ संदीप गोरीवले, सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व वाडी अध्यक्ष प्रतिनिधी, सर्व पालक वर्ग, शाळेचे माजी शिक्षक रामाणे सर, पालशेतकर मॅडम, शाळा उमराठ नंबर ३ चे मुख्याध्यापक सैतवडेकर सर, शाळा व्यवस्थापन समिती मधील सर्व सदस्य, पालक शिक्षक संघामधील सर्व सदस्य, त्याचप्रमाणे शाळेचे माजी विद्यार्थी आणि गावातील ग्रामस्थ यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अवेरे यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे सहकार्य दिल्याबद्दल आभार मानून समारोप केला. Umrath School Annual Reunion Concluded

