गुहागर, ता. 04 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने हाउसिंग कॉलनी येथील मेडिकल सेंटर मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या रक्त शिबिरामध्ये ५१ जणांनी रक्तदान केले. Blood Donation Camp by RGPPL Company


उद्घाटन कार्यक्रमासाठी आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती नागमणी, एच. आर. विभागाचे प्रमुख स्नेहसीस भट्टाचार्य, सुरेश कुरूप, श्रीनिवास, अमीत शर्मा, संजना महीला समितीच्या अध्यक्षा सीमा अगरवाल, डॉ. मंजुनाथ, डॉ. आश्विन,डॉ. निबीया, सोमनाथ मिश्रा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रमुख मोहित सुमन, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. परेश मिश्रा, आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, महाराष्ट्र सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक व आरजीपीपीएल, कोंकण एलएनजी कंपनीतील अधिकारी,कर्मचारी, कामगार यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी आरजीपीपीएल कंपनीचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केलं. Blood Donation Camp by RGPPL Company