पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय, शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठच्या सहकार्याने नवलाई देवीची सहाण सभागृह येथे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय, शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन या विषयांबाबत तज्ञांमार्फत एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २४ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ११ ते साय. ५ या वेळेत संपन्न झाले. Training by Animal Husbandry Department at Umrath
सदर प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून पशुधन विकास अधिकारी, डॉ. आर.एस. जायभाये, डॉ. ए. ए. गोरे, पंचायत समिती गुहागरचे डॉ. आर. एस. खांबल, पशुवैद्यकीय दवाखाना हेदवीचे डॉ. पी.पी.हळदणकर सोबत गुहागरचे परिचर श्री मिसाळ, ड्रेसर श्री सोलकर आणि हेदवीचे ड्रेसर पोवार हे पशुसंवर्धन विभागातर्फे उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा लाभ सुमारे ४० ग्रामस्थ शेतकर्यांनी घेतला. Training by Animal Husbandry Department at Umrath
यावेळी डॉ. आर.एस जायभाये यांनी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय या विषयावर तर डॉ. ए.ए. गोरे यांनी शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच शासकीय विविध योजना, पशू व पक्षी याबाबतीत येणारे साथीचे रोग, त्यावरील उपाययोजना, घ्यायची काळजी, त्यांचे पालन-पोषण, संगोपन, सोयी-सुविधा, फायदे-तोटे, कर्ज व्यवस्था आणि उपलब्ध मार्केटिंग इत्यादी मुद्यांवर सोप्या आणि साध्या पद्धतीने मार्गदर्शन केले. Training by Animal Husbandry Department at Umrath
हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे उपसरपंच सुरज घाडे, सदस्या सौ. साधना गावणंग, कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, शाईस दवंडे, ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, श्रीकांत कदम, विनायक कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी उपस्थित मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थी ग्रामस्थ शेतकरी यांचे आभार मानून सरपंच जनार्दन आंबेकर यांनी समारोप केला. Training by Animal Husbandry Department at Umrath