• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राम. वेलदूर येथे विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

by Guhagar News
January 27, 2024
in Guhagar
125 2
2
Republic Day at Gram Panchayat Veldur
246
SHARES
704
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : ग्रामपंचायत वेलदूर येथे प्रजासत्ताक दिन सलोनी पालशेतकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी सरपंच दिव्या ताई वनकर यांनी शाळेच्या गुणवत्ता विकासाला प्रेरणा मिळावी  म्हणून नाविन्यपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेत ध्वजारोहन करण्याचा आपला बहुमान सलोनी पालशेतकर या विद्यार्थिनीला दिला. Republic Day at Gram Panchayat Veldur

सलोनी पालशेतकर ही नवानगर शाळेतील अष्टपैलू विद्यार्थिनी तसेच एकलव्य पुरस्कार विद्यार्थिनी आहे.  तिने  स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळवून देण्यामध्ये स्वच्छता मॉनिटर म्हणून काम केले. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, रंगभरण स्पर्धा यामध्ये चौफेर कामगिरी करणारी विद्यार्थिनी कुमारी सलोनी सुदर्शन पालशेतकर इयत्ता सातवी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वेलदूर नंबर एक वेलदूर उर्दू वेलदूर नवानगर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. एकलव्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कुमारी सलोनी पालशेतकर हिचा ग्रामपंचायत वेलदूर तर्फे सरपंच दिव्याताई वनकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. Republic Day at Gram Panchayat Veldur

सरपंच दिव्याताई वनकर यांनी त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपला गाव सर्वांगीण व परिपूर्ण विकासाच्या क्षेत्रात प्रगतीमध्ये अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती स्मिताताई धामणस्कर, मा. उपसभापती विठ्ठल भालेकर, सरपंच दिव्याताई वनकर, उपसरपंच राजू शेठ जावळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शंकर कोळथरकर, पोलीस पाटील श्री वायंगणकर, ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कृषी व आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ, विविध मंडळाचे अध्यक्ष, युवा वर्ग, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक गणेश विचारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी कुळे यांनी केले. Republic Day at Gram Panchayat Veldur

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRepublic Day at Gram Panchayat VeldurUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet62
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.