श्रीराम दत्त सेवा आरे संघ विजेता तर सेव्हन स्टार संघ उपविजेता
गुहागर, ता. 25 : मधील खालचापाट कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित कै. नरेंद्र वराडकर व कै. नरेश सुरेश वराडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीराम दत्त सेवा आरे संघाने अजिंक्यपद पटकावले, तर उपविजेता सेव्हन स्टार संघ ठरला. Kanhaiya Star Mandal Kabaddi Tournament Concluded
स्पर्धेची पहिली उपांत्य फेरीची लढत सेव्हन स्टार विरुद्ध सिद्धेश्वर वेलदुर मध्ये झाली. ही अटीतटीच्या ठरलेली लढत टाय झाली. कबड्डीच्या नियमानुसार दोन्ही संघांना पाच -पाच चढाई देण्यात आल्या. त्यामध्ये सेवन स्टार संघ हा विजयी झाला. यावेळी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश ब्रीद याने स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सेव्हन स्टार संघाला रोख एक लाख रुपयाचे, तसेच पराभूत झालेल्या सिद्धेश्वर वेलदूर संघातील प्रमुख चढाई कार तेजस धामणस्कर (एका चढाईत दोघांना बाद केले) याला 51 हजार रुपये, सिद्धेश्वर वेलदूर संघाने सेव्हन स्टार संघाला प्रथम ऑल आउट केले म्हणून रोख अकरा हजार रुपये असे या तिघांना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश ब्रीद यांनी बक्षीस म्हणून दिले. Kanhaiya Star Mandal Kabaddi Tournament Concluded
स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरी श्रीराम दत्त सेवा आरे संघाने तृप्ती नगर अडुर संघावर एकतर्फी मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीराम दत्त सेवा आरेने सेव्हन स्टार संघावर एकतर्फी मात करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम फेरीच्या लढतीत श्रीराम दत्त सेवा आरेच्या चढाई कार राज भोसले याने एका चढाईत दोन खेळाडू बाद केले म्हणून सिद्धेश ब्रीद यांनी 25 हजार रुपये रोख बक्षीस दिले. तसेच सेव्हन स्टार संघाचा चढाई कार स्वप्निल सांगळे याला 25 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. तर कार्तिक कळझुनकर याने श्रीराम दत्त सेवा आरे च्या आदित्य भोसले या चढाईकराने एका चढाई दोन गडी टिपले म्हणून रोख 25 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. Kanhaiya Star Mandal Kabaddi Tournament Concluded
या स्पर्धेसाठी कन्हैया स्टार कला क्रीडा मंडळाने ठेवलेले 21 हजार रुपये व चषक विजेते श्रीराम दत्त सेवा आरे संघाला देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या सेव्हन स्टार संघाला अकरा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीसांमध्ये उत्कृष्ट पकड रोशन भोसले (श्रीराम दत्त सेवा आरे) चषक, उत्कृष्ट चढाईकर राज भोसले (सेव्हन स्टार )चषक, विशेष खेळाडू सन्मान स्वप्निल सांगळे (सेव्हन स्टार) चषक, अंतिम सामन्यातील सामनावीर राज भोसले (श्रीराम दत्त सेवा आरे) चषक, स्पर्धेचे मालिकावीर राज भोसले (श्रीराम दत्त सेवा आरे) चषक व सायकल देऊन या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Kanhaiya Star Mandal Kabaddi Tournament Concluded
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश ब्रीद, तरुण उद्योजक कार्तिक कळझुनकर, गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष निलेश मोरे, रोहन भोसले, माजी नगरसेवक अमोल गोयथळे, स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष साहिल आरेकर, कन्हैया स्टार कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मनीष गोयथळे, शिवसेनेचे निलेश मोरे, लाइन्स क्लबचे संतोष वरंडे, गावातील ग्रामस्थ विद्याधर गोय थळे, शोधन वराडकर, संतोष वराडकर, संतोष गोयथळे, संदेश कचरेकर, भरत गोयथळे, सुनील गोयथळे आदी बक्षीस समारंभाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेतील समालोचक म्हणून दीपक देवकर, अमोल नरवणकर, सिद्धेश आरेकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी साठी कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. या कबड्डी स्पर्धेमध्ये लाखो रुपयांची बक्षिसे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश ब्रीद याने दिले. Kanhaiya Star Mandal Kabaddi Tournament Concluded