यशवंत बाईत यांचा २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल गावासाठी जलजीवन योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा राबवताना अनेक त्रुटी असून या योजनेतून निधीचा दुरूपयोग सुरू आहे. याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने अंजनवेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा संयोजक यशवंत बाईत यांनी २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा पंचायत समितीला निवेदनाद्वारे दिला आहे. Misuse of Anjanvel Jal Jeevan Fund
या निवेदनात म्हटले आहे की, पेठ अंजनवेलसाठी पाणी योजना घेताना ज्या संस्थेने पहाणी अहवाल तयार केला त्या अहवालात अनेक गंभीर त्रुटी आहेत. याचे अंदाजपत्रक सुमारे ५५ लाख १५ हजार १७० रूपये तयार करण्यात आले. यामधून खोदाई करण्यात आलेल्या विहिरीला पुरेसा पाणीसाठा न झाल्याने ती बुजवण्यात आली. भूजल सर्वेक्षण विभागाने ज्या जागेत पाणी तपासणी करून दाखला दिला होता. त्या जागेत विहीर न घेता चुकीच्या जागेत विहीर घेतली. मात्र याकडे शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. Misuse of Anjanvel Jal Jeevan Fund

पेठ अंजनवेल साठी शासनाकडे सुमारे १ कोटी १८ लाख २७ हजार २८२ रूपये अंदाजपत्रकाची नवीन पुर्नयोजना तयार केली आहे. तसेच मौजे अंजनवेलसाठी पाणी योजना घेतानाही ज्या संस्थेने पहाणी अहवाल तयार केला त्या अहवालातही अनेक गंभीर त्रुटी आहेत. ८५ लाख ८३ हजार ३९८ रूपये अंदाजपत्रकाची योजना घेण्यात आली. असून या योजनेत जी विहीर दाखवली आहे, त्या विहीरींचे मार्च महिन्यापासून पाणी कमी होते. मे महिन्यात विहीरीची पातळी पूर्णपणे तळाला जाते. त्यावेळी ग्रामस्थांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. अशा अनेक गंभीर त्रुटी असून डिसेंबर २०२२ पासून यावर पत्रव्यवहार करत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे २६ जानेवारी २०२४ पासून गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. Misuse of Anjanvel Jal Jeevan Fund
