• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पराग कांबळे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष

by Manoj Bavdhankar
January 24, 2024
in Guhagar
120 1
1
Parag Kamble President of Travelers Federation
236
SHARES
673
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर

गुहागर, ता. 24 : येथील कोकण प्रवासी महासंघाच्या गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. गुहागर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवास येथे झालेल्या शाखेच्या या सभेमध्ये ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सदरील कार्यकारिणी सन 2024 ते सन 2025 पर्यंतचा असून या कार्यकारिणीला संस्थापक अध्यक्ष श्री. वसंतरावजी भोसले साहेब यांनी अधिकृत मान्यता दिलेली आहे. त्यानंतर गुहागर आगाराचे व्यवस्थापक यांना निवेदने सादर करण्यात आली. Parag Kamble President of Travelers Federation

कोकण प्रवासी महासंघाच्या गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी तालुकाप्रमुख, संघटक व अध्यक्ष – श्री. पराग कांबळे, उपाध्यक्ष – श्री. सुधाकर मयेकर, श्री. महंमद दळवी, श्री. सुभाष रजपूत, श्री. मनोज पावसकर, सचिव श्री. सुजित शिंदे, सहसचिव – श्री. सुभाष पवार, श्री. गोपाळ झगडे, खजिनदार – श्री. सुधीर बसणकर, सहखजिनदार – श्री. रमाकांत खेडेकर, कार्यकारिणी सदस्य श्री. प्रशांत कांबळे, श्री. अभय हळवे, तालुका कार्यकारिणी सदस्यपदी सौ. अमृता ताई जोशी (महिला आघाडी अध्यक्ष गुहागर तालुका), सौ. सोनाली महाडे (तालुका सचिव महिला आघाडी) श्री. विद्याधर गोयथळे, श्री. गजानन मांडवकर, श्री. बाबुराव मांडवकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. Parag Kamble President of Travelers Federation

या सभेचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वसंत रावजी भोसले यांच्या हस्ते प्रथम श्रीफळ वाढवून सभेला प्रारंभ झाला. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष श्री. वसंतरावजी भोसले साहेब यांचा प्रवासी महासंघाच्या गुहागर तालुका शाखेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सभेमध्ये प्रवाशांच्या सुविधा आणि समस्या या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर सभेचे सूत्रसंचालन श्री. पराग पांडुरंग कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सुभाष पवार कार्यकारणी सदस्य यांनी केले. Parag Kamble President of Travelers Federation

गुहागर तालुका महिला आघाडीची स्वतंत्र कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल असे तालुका अध्यक्ष श्री. कांबळे यांनी सांगितले. तसेच तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अमृता ताई जोशी यांनी आपले एस.टी. बाबत विचार मांडले. या सभेला श्री .वसंतराव भोसले यांच्यासोबत श्री. अविनाश चव्हाण, श्री. दिलीप चव्हाण, श्री. दीपक शिरकर, श्री. श्रीकृष्ण तटकरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. Parag Kamble President of Travelers Federation

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarParag Kamble President of Travelers FederationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.