गुहागर, ता. 20 : खालचापाट येथील कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कै. नरेश सुरेश वराडकर यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Taluka level kabaddi tournament in Guhagarat

सदर स्पर्धा सोमवार दिनांक 22 जानेवारी व 23 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २१ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ११००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर वैयक्तिक उत्कृष्ट चढाई रोख रक्कम व चषक, उत्कृष्ट पकड रोख रक्कम व चषक, अंतिम सामन्यातील सामनावीर रोख रक्कम व चषक व सर्वोत्कृष्ट खेळाडू रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मनीष गोयथळे व मंडळाचे सदस्य मेहनत घेत आहेत. Taluka level kabaddi tournament in Guhagarat