• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोळवली हायस्कूलला क्रीडा साहित्य भेट

by Guhagar News
January 20, 2024
in Guhagar
80 0
0
Gift of Sports Materials to Kolvali High School
156
SHARES
447
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रसिद्ध टेनिस कोच विश्वनाथ मालप यांचेकडून भेट

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली संचालित विद्यालयाला मुंबईतील प्रसिद्ध टेनिस कोच व या विद्यालयाचा माजी विद्यार्थी कुमार विश्वनाथ मालप यांचेकडून क्रीडा दिनाच्या दिवशी क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एम. वाय. पाटील यांनी विश्वनाथ मालप व संदेश घाणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. Gift of Sports Materials to Kolvali High School

सुरुवातीपासूनच विश्वनाथ मालप यांना खेळाविषयी आवड असल्याने ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी ही त्यांची मनापासून तळमळ होती. त्यासाठी क्रीडा क्षेत्रांमध्ये लागणारे क्रीडा साहित्य थाळी, गोळा, भाला, हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट संच, बॅडमिंटन संच, दोरी, स्टॉप वॉच, शिट्ट्या, मेजर टेप, रिले बॅटन, मेडिकल किट, यासारख्या अनेक वस्तू विद्यालयाला भेट म्हणून दिल्या. त्याचबरोबर मकर संक्रातीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून समोसे व जिलेबी यांचेही वाटप विश्वनाथ मालप यांचे कडून करण्यात आले. Gift of Sports Materials to Kolvali High School

विश्वनाथ मालप यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये क्रीडा क्षेत्रांमध्ये  प्रगती कशी करावी, त्याचबरोबर आहार, विविध खेळ, शिस्त याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एम.वाय. पाटील यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यालयाला क्रीडा साहित्य दिल्याबद्दल या दोघांचे ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शांताराम वाघे, उपाध्यक्ष श्री.बाबाजी मुंडेकर, सचिव श्री.नारायण मोहिते, सहसचिव श्री. शंकर जोशी, खजिनदार श्री. वासुदेव डिंगणकर, सदस्य श्री. नंदकिशोर  सुर्वे, श्री. दामोदर डिंगणकर,श्री. रामचंद्र मोरे,  श्री. सदाशिव जोशी, श्री. रवींद्र गावडे,श्री. संतोष दिनकर यांनी मनापासून आभार मानले. श्री. जाधव यांनीही या दोन विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये खूप प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लवटे. बी.के. यांनी केले. तर श्री. सी. एस. पांडे सर. यांनी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली. Gift of Sports Materials to Kolvali High School

Tags: Gift of Sports Materials to Kolvali High SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.