• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेडमध्ये दि २२ रोजी श्रीरामाची शोभायात्रा

by Manoj Bavdhankar
January 19, 2024
in Ratnagiri
80 1
1
157
SHARES
448
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राम भक्त वैभव खेडेकर ; श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा जिर्णोद्धारानिमित्त

गुहागर, ता. 19 : आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा आस्थेचा विषय असलेला अयोध्या येथे जिर्णोद्धार झालेले श्री रामाचे भव्य मंदिर. हे मंदिर व्हावे हि अनेक हिंदू आणि भारतीयांची इच्छा होती. आज आपण सर्वांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होताना पाहून आनंद होत आहे. दि २२ जानेवारी रोजी रामलल्ला रामजन्मभूमी येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा जिर्णोद्धार होत आहे. या निमित्ताने एक रामभक्त म्हणून वैभव खेडेकर यांना खेडमध्येही हा उत्सव व्हावा असे वाटते. Procession of Sri Rama in Khed

तरी खेड वासीयांच्या वतीने दि २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत प्रभू श्री रामांचा रथ, हिसार हरियाणा येथील १० फुटी रामभक्त हनुमान, घोडे, उंट यांची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. या निमित्ताने सर्वांना साखर वाटप तसेच शोभायात्रेत सहभागी होणाऱ्यांना टोप्या, गळ्यातील पट्टे, बॅच आणि झेंडे वाटप होणार आहे. तरी सर्व धर्माभिमानी नागरिकांनी विविध वेशभूषा करून ह्या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन खेड वासीयांकडून करण्यात आले आहे. Procession of Sri Rama in Khed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarProcession of Sri Rama in KhedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet39
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.