शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सेंद्रिय शेती प्रकल्पाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील सर यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. Organic Farming Project at Kharvate-Dahivali

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून या प्रकल्पाअंतर्गत संपुर्ण सेंद्रिय पद्धतीने विविध फळ, पालेभाज्या व फुलांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये कोबी, काकडी, कलिंगड व झेंडु ई. चा समावेश आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा.महेश घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. Organic Farming Project at Kharvate-Dahivali

