अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी २२ जानेवारीला संपूर्ण देशात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर
दिल्ली, ता. 19 : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात प्रभूराम विराजमान होतील. या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरू आहे. या दिवशी संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. Big announcement by the central Government

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या अभिषेक समारंभात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी केल्यानंतर केंद्राने देशातील केंद्र सरकारी आस्थापने अर्ध्या दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहतील. Big announcement by the central Government