रत्नागिरी, ता. 19 : निसर्ग संवर्धन व समाजकार्यात अग्रेसर संस्था “वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” पुरस्कृत श्री. शुभम पांडे संस्थापकिय अध्यक्ष श्री.आभिजित वाघमोडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही “पर्यावरण संवर्धन चित्रकला स्पर्धा” दि. 26 ते 30 जानेवारी २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे. Environmental Protection Painting Competition
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, यांमुळे जैवविविधतेचे होत असलेले नुकसान, यामुळे जीवसृष्टीवर होणारा परिणाम, त्यावर उपाय योजना करताना विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतुन निघणाऱ्या विचारांना कागदावर उतरविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३ गटांमध्ये घेण्यात येणार आहे. Environmental Protection Painting Competition


स्पर्धेचे विषय
- आवडता प्राणी – १ली ते ४थी
- निसर्ग संवर्धन माझी जबाबदारी -५ वी ते ८वी
- मी निसर्ग रक्षक -९वी ते १२वी
या स्पर्धेमध्ये ज्या ज्या शाळांना भाग घ्यायचा आहे. त्यांनी खालील प्रवेशिका भरून पाठवावी. अन्यथा व्हॉटसअप वर (९३५६११८४३७, ८५२७४१५५६०, ९८३५६६५९१६, ८४४६२७७०१०) पाठविण्यात यावी. प्रवेशिकेमध्ये सर्व माहिती दिली गेली आहे. अधिक माहितीसाठी ९४०५५९७७८२ WFN रत्नागिरी या क्रमांकावर संपर्क साधा. Environmental Protection Painting Competition
स्पर्धा प्रवेशिका
शाळा, विद्यालयाचे नाव :-
प्राचार्य, मुख्याध्यापकांचे नाव :-
मो.नं. :-
सदर प्रवेशिका २३/०१/२०२४ पर्यंत संस्थेच्या (वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा कार्यालय, मू.पो.पोसरे, बौद्धवाडी, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी,) या पत्यावर पाठवावी. (अन्यथा ९३५६११८४३८, ९५२७४१५५६०, ९८३४६६५९१६) या क्रमांकांवर व्हॉटसअप करावी. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपले अनमोल कल्पक विचार आमच्या पर्यंत पोहोचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Environmental Protection Painting Competition