• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार

by Guhagar News
January 17, 2024
in Maharashtra
73 1
0
Conclusion of Maratha Reservation March
143
SHARES
409
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून स्वागत

दावोस, ता. 17 : – जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्विट्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत. या पार्श्वभुमीवर स्विट्झर्लंडमधील विविध भागात राहणाऱ्या या भारतींयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत मोठ्या अपुर्वाईने करण्याचे निश्चित केले आहे. Acceptance of Brihanmaharashtra’s invitation by Chief Minister

भारतीयांच्या विशेषतः या मराठी भाषिकांनी झुरीक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास येण्याचे मान्य केल्याबद्दल या सर्व मराठी बांधवांनी विशेष आनंदही व्यक्त केला आहे. या निमित्ताने स्विट्झर्लंडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या या मराठीजनांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत स्वागताच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. या परिषदेच्या यशासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.  Acceptance of Brihanmaharashtra’s invitation by Chief Minister

बृहन्महाराष्ट्र स्विट्झर्लंडचे (जीनिव्हा) अध्यक्ष अमोल सावरकर म्हणाले की, मुख्यमंत्री श्री. शिंदे हे एका महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी इथे येत आहेत.  इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी मराठी जनसमुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे, हे विशेष. म्हणूनच आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देत आहोत. महेश बिराजदार (मुळचे लातूर), मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे नेतृत्व आम्हा मराठी जनांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करताना, त्यांना शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत आहे. श्रीमती किर्तीमालिनी गद्रे (पदाधिकारी महाराष्ट्र मंडळ, स्विट्झर्लंड), मी मुळची ठाण्याची आहे. त्यामुळे आमच्या ठाण्यातील श्री. शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येथे येत आहे. याचा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे मोठी तयारी केली आहे. त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे, याचाही खूप मोठा आनंद आहे. Acceptance of Brihanmaharashtra’s invitation by Chief Minister

शेखर काकडे यांनी पत्नी विद्या, कन्या बिल्वा काकडे (झुरीक) यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की आम्ही झुरीकमध्ये गेली दहा वर्षे राहत आहोत. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्विट्झर्लंड दौऱ्यासाठी येत आहेत. याचा खूप मोठा आनंद आहे. स्विट्झर्लंडमधील तमाम महाराष्ट्रीयन बांधवांच्यावतीने स्वागत करतो, आणि त्यांच्या या दौऱ्यालाही शुभेच्छा देतो. प्रभूद्य यत्नाळकर हे मुळचे पुण्याचे आहेत. ते झुरीकमध्ये राहतात. त्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी स्वागत केले आहे. सौ. मंजिरी यत्नाळकर यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे झुरीकमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत. Acceptance of Brihanmaharashtra’s invitation by Chief Minister

Tags: Acceptance of Brihanmaharashtra's invitation by Chief MinisterGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share57SendTweet36
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.