कन्हैया स्टार क्रीडा मंडळ आयोजित; श्री स्वामी समर्थ आबलोली संघ उपविजेता
गुहागर, ता. 17 : कन्हैया स्टार क्रीडा मंडळ हे राजकारण विरहित मंडळ असून ते समाजाचा एकोपा जपणारा मंडळ असल्याचे मत गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी व्यक्त केले. कन्हैया स्टार क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरीत दत्तकृपा बोऱ्या व श्री स्वामी समर्थ आबलोली संघामध्ये झाली. Borya team won in the Tribute Cup competition
अंतिम फेरीत दत्तकृपा संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात 55 धावा पटकावल्या परंतु श्री स्वामी समर्थ संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना सहा षटकात अवघ्या 44 धावाच करता आल्या. बोऱ्या संघाने 11 धावांनी विजय मिळवत कन्हैया स्टार क्रीडा मंडळ आयोजित कै.नरेश (नाऱ्या भाऊ) व कै. नरेंद्र (नरू दादा)वराडकर श्रद्धांजली चषक 2024 क्रिकेट स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले. विजेत्या दत्तकृपा बोऱ्या संघास 25 हजार रुपये व चषक, उपविजेत्या श्री स्वामी समर्थ संघाला 15000 रुपये व चषक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. तर वैयक्तिक मध्ये उगवता तारा म्हणून राज नागवेकर व अद्वैत पडवळ या दोघांची निवड करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज अविनाश पटेकर याला चषक व बॅट, उत्कृष्ट गोलंदाज विनायक पाटील चषक व शूज, क्षेत्ररक्षक सुयश पाटील चषक व गॉगल देण्यात आले. मालिकावीर अमित पवार याला चषक, बॅट, कॅप, ट्रॅक सूट, शूज देण्यात आले. तर अंतिम सामन्यातील सामनावीर दीप मोरे याला चषक व स्मार्ट वॉच देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Borya team won in the Tribute Cup competition
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) सुरेश सावंत, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी व निर्मल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष जैतापकर, लोकनेते सदानंद आरेकर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष साहिल आरेकर, मुन्ना देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते पद्माकर आरेकर, दीपक शिरधनकर, नेहा वराडकर, दिलीप गोयथळे, भरत गोयथळे, हेमचंद्र आरेकर, अशोक गोयथळे उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचक म्हणून सिद्धेश आरेकर व श्रीरंग वराडकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कन्हैया स्टार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मनीष गोयथळे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. Borya team won in the Tribute Cup competition