संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली संचालित माध्यमिक विद्यालयात सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठीच्या शाळांतर्गत दोन दिवशीय क्रिडा स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या. Annual sports festival held in Kolvali
यावेळी माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या प्रांगणात विविध मैदानी क्रिडा प्रकारासाठी वेगवेगळी क्रिडांगणे, क्रिडा मैदाने तयार करण्यात आली होती. यावेळी कब्बडीच्या मैदानाचे उद्घाटन कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.माटल यांचे शुभहस्ते करण्यात आले. तर हॉलीबॉलच्या मैदानाचे उदघाटन पाचेरी सडा गावचे जेष्ठ नागरिक श्री.गुणाजी खांबे यांनी केले. उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना २०२४ या नविन वर्षाचे कॅलेंडर भेट दिले. Annual sports festival held in Kolvali

दोन दिवशीय क्रिडा महोत्सवात कबड्डी, खो खो, लंगडी, हॉलीबॉल तसेच वैयक्तिक क्रिडा स्पर्धेत लांब उडी, धावणे, उंच उडी, फणी गेम्स, संगित खुर्चा आदी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी उत्कृष्ठ खेळाडूंना मान्यवरांचे हस्ते रोख रक्कमेची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.शांताराम वाघे, उपाध्यक्ष श्री.बाबाजी मुंडेकर, सचिव श्री.नारायण मोहिते, सह.सचिव श्री.शंकर जोशी, खजिनदार श्री.वासुदेव डिंगणकर, सदस्य श्री.नंदकिशोर सुर्वे, श्री.दामोदर डिंगणकर, श्री.रामचंद्र मोरे, श्री.सदानंद जोशी, श्री.रविंद्र गावडे, श्री.संतोष डिंगणकर आदींनी मुख्याध्यापक श्री.एम.वाय. पाटील, क्रिडा शिक्षक श्री.बी.के.लवटे यांचेसह सर्व शिक्षकांचे, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सी.एस.पांडे यांनी केले. Annual sports festival held in Kolvali
