• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाट्ये किनाऱ्यावरील सहलीने दिली संशोधनाची दृष्टी

by Guhagar News
January 13, 2024
in Ratnagiri
66 1
0
The trip provided a research perspective
130
SHARES
370
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 13 : सकाळी धुके आणि गुलाबी थंडी अशा प्रसन्न वातावरणात भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवात किनारा सहलीचे आयोजन केले. यामध्ये रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी यात भाग घेतला. किनाऱ्यावरील जैवविविधतेचे डॉक्युमेंटेशन करून ठेवण्याची सूचना कोस्टल कॉंझर्वेशन फाउंडेशनचे अभ्यासक प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांनी केली. भाट्यात आज सरगॅसम, शेल बायंडर वर्म, सॅंड बबलर क्रॅबनी वाळूत केलेली बिळं, घोस्ट क्रॅब या वेळी पाहायला मिळाले. The trip provided a research perspective

The trip provided a research perspective

सागर महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. यामध्ये दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत भाट्ये किनाऱ्यावर सहल काढली. प्रदीप पाताडे म्हणाले की, मरीन लाईफ ऑफ मुंबई हे फेसबुक पेज आहे, त्यावर आम्ही आठवड्यातून एक फोटो अपलोड करतो. त्यावर तज्ज्ञ माहिती देतात. डॉक्युमेंटेशन फार महत्त्वाचे आहे. किनाऱ्यावर दिसणारे प्राणी आय नॅचरलिस्ट या अॅपवर अपलोड करा. हा डेटा अभ्यासासाठी उपयुक्त ठरतो. संशोधकांना एकाच वेळी माहिती मिळते. रत्नागिरीमध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत. त्यांचा अभ्यास करणे शक्य आहे. The trip provided a research perspective

The trip provided a research perspective

डॉ. अमृता भावे यांनी सांगितले की, सकाळी छान किनारा सफर झाली. जीवंत शिंपले, वेगवेगळ्या प्रकारचे खेडके, सी वीड प्रकारातील वॉशटॉक, लाटेबरोबर वाहून आलेले अल्गी, वेगवेगळ्या प्रकारचे शंख- शिंपले, वाळूचे प्रकार, छान छान पक्षीसुद्धा दिसले. सागर महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून यंदा प्रतिसाद वाढला आहे. भरती ओहोटीचा परिणाम दिसणाऱ्या भागातून पाहणी केली. येथे जैवविविधता वेगळी पाहायला मिळते. इथले प्राणी येथे पाणी असो वा नसो ते जगू शकतात. पांढरी वाळू, काळ्या वाळूचे किनारे रत्नागिरीत आहेत. The trip provided a research perspective

या वेळी आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन, संचालक पुरुषोत्तम पेंडसे, नितीन करमरकर, श्रीप्रसाद देशमुख, जगदीश खेर, कमोडोर श्रीरंग जोगळेकर यांच्यासमवेत सागर विषयक अभ्यासक, संशोधक उपस्थित होते. The trip provided a research perspective

The trip provided a research perspective

यावेळी महोत्सवात शुक्रवारी १३ जानेवारीला सकाळी ७ ते ८.१५ या वेळेत भाट्ये किनाऱ्यावर अभ्याससहलीत प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे मार्गदर्शन करतील. त्यानंतर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात ९.३०  मरीन बायोटेक्नॉलॉजीवर डॉ. समीर डामरे यांचे व्याख्यान, ११.१५ वाजता कोरल्सवर डॉ. नाणजकर, २ वाजता खारफुटीची गुपिते या विषयावर डॉ. विनोद धारगळकर व्याख्यान देतील. १०.३० आणि १२.३० वाजता लघुपट दाखवले जातील. ३.१५ वाजता राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने बनवलेली सी बोट समुद्रात १५० फूट खाली गेली की तिच्यावरील कॅमेऱ्यांतून थेट प्रक्षेपण दाखवण्याचा अनोखा कार्यक्रम होणार आहे. पाणबुडी खाली पाठवल्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पडद्यावर चित्रीकरण पाहता येणार आहे. ४.४५ ते ६.३० या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी समुद्रकिनाऱ्यावर अभ्यास सहल काढली जाईल. The trip provided a research perspective

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe trip provided a research perspectiveUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.