राज्यस्तरीय फिल्ड इंनडोअर आर्चरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक
गुहागर, ता. 12 : पुणे येथे 6 जानेवारी 2024 रोजी झालेल्या 13 व्या राज्यस्तरीय फिल्ड इंनडोअर आर्चरी स्पर्धेमध्ये यश सुभाष सावंत याने एक सुवर्णपदक (गोल्ड) आणि एक रजत (सिल्वर )पदक पटकावले. त्याची राष्ट्रीय (नॅशनल) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. Selection of Yash Sawant for National Tournament
कु. यश सावंत हा विद्यार्थी प्रिय शिक्षक, क्रीडा संघटक व उत्कृष्ट मराठी समालोचक श्री. सुभाष सावंत सर यांचा चिरंजीव आहे. या यशामध्ये TWJ आर्चरी अकॅडमी आणि मुख्य प्रशिक्षक श्री. ओंकार घाडगे, प्रशिक्षक अभिषेक पालकर यांचे मार्गदर्शन लाभले. Selection of Yash Sawant for National Tournament
पालशेत हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री मनोज जोगळेकर सर यांच्या प्रेरणेने या खेळाला पालशेत हायस्कूलमध्ये सुरुवात झाली. त्यामुळेच यश सावंत सारखा ग्रामीण भागातील विद्यार्थी सुवर्णपदकाचा मानकरी होऊ शकला तसेच क्रीडा शिक्षक श्री. जाधव सर श्री. पाटील सर यांचेही नेहमी मोलाचे मार्गदर्शन असते. या त्याच्या सुवर्णपदकाच्या कामगिरीमुळे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थआणि क्रीडाप्रेमी यांनी खूप अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Selection of Yash Sawant for National Tournament