सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी, ता. 10 : धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न रविवारी सत्यात उतरले. सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी सकाळी झुंबा डान्सने वॉर्म अपला सुरवात झाली. गुलाबी थंडी, नदी, दऱ्या, झाडी आणि खाडीकिनाऱ्यावरून निसर्गरम्य वातावरणात निघालेली कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धा अविस्मरणीय ठरली. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी तब्बल १५०० स्पर्धकांनी ५, १० आणि २१ किलोमीटरचे अंतर कापले. मार्गावरील सर्व गावांमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे वाजवून या धावदुतांचे आगळेवेगळे जल्लोषात स्वागत केले. २१ किमीचे अंतर फक्त १ तास १० मिनीटांत कापून याने विवेक मोरे याने हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. Huge response to Konkan Coastal Marathon
या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील वर्षीची मॅरेथॉन ५ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याचे या वेळी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी या वेळी जाहीर केले. रविवारी पहाटे ५ वाजल्यापासून थिबा पॅलेसजवळ झुंबा डान्स व वॉर्म अप सुरू झाला. त्यानंतर मथुरा हॉटेल येथून ६ वाजता शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू ऐश्वर्या सावंत, संपदा धोपटकर आणि वीरमाता श्रीमती ज्योती राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून २१ किमी स्पर्धेचे उद्घाटन झाले. Huge response to Konkan Coastal Marathon
हॉटेल मथुरा येथून २१ किलोमीटरसाठी धावपटू प्रचंड वेगाने धावू लागले. नाचणे, शांतीनगर, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप या मार्गावरून येताना कधी सपाटी, चढाव, उतार यावरून पुढे निघाले. वाटेत विविध ठिकाणी ग्रामपंचायतींनी हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था केली. १० किमीसाठी ६.१५ वाजता झेंडा दाखवला व नाचणे, शांतीनगर व वळसा मारून त्याच मार्गाने मारुती मंदिर मार्गे भाट्ये येथे पोहोचले. तर ५ किमीची स्पर्धा ६.५० वाजता सुरू झाली व मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत आली. भाट्ये येथे समुद्रकिनाऱ्यावर सांगता समारंभ झाला. यावेळी स्पर्धकांच्या तोंडून वॉव, अप्रतिम, वंडरफूल असे उत्स्फूर्त शब्द ऐकायला मिळाले. Huge response to Konkan Coastal Marathon
सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रफुल्ल सप्रे, श्रीमती विजया राणे, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी, डॉ. नितीन सनगर, महेश सावंत, एनसीसी कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. होते. या स्पर्धेसाठी बॅंक ऑफ इंडिया, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, ब्रूक्स, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, एमआर असोशिएशन, जिल्हा पोलिस, वाहतूक पोलिस, जिल्हा शासकीय रुग्णालय, रुग्णवाहिका, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, आरोही फिजिओथेरपी, सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. फोटोग्राफर ओम पाडाळकर व सहकारी आदित्य दशवंतराव, यश सावर्डेकर, साईराज टिकेकर, इम्रान डांगे, गणेश दुबल, ज्ञानेश कांबळे, अनुपम तिवारी, ओंकार कदम, श्वेता बेंद्रे, कौस्तुभ वायंगणकर, सचिन सावंत, प्रसाद शिवगण, ओंकार भालेकर, मयुर पाडळकर यांनी फोटोग्राफी केली. Huge response to Konkan Coastal Marathon
आगळेवेगळे स्पर्धक
खेडमधील दिव्यांग सुरेश वेलणकर यांनी २१ किमी अंतर कापले. नेदरलॅंड येथील महिला कोकी वॅन डॅम यांनीही मॅरथॉन पूर्ण केली. रत्नागिरीतील ७१ वर्षीय प्रतिभा मराठे यांनी साडी नेसून ५ किमीची स्पर्धा पूर्ण करत गटात प्रथम क्रमांक मिळवला. रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी व्हिलचेअरवरून स्पर्धा पूर्ण केली. कर्नाटक येथील ५ वर्षीय लहान मुलाने स्पर्धा पूर्ण करून कौतुकाची थाप मिळवली.
स्पर्धेची वैशिष्ट्ये
* परदेशी महिला नागरिकही सहभागी * साडी नेसून धावणाऱ्या मराठे आजी गटात प्रथम * ७ ते ८८ वयोगटातील लोकांचा सहभाग * १ तास १० मिनीटांत कापले २१ किमी अंतर * जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सुद्धा धावले २१ किमी * भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर धावदुतांचा मेळा * रत्नागिरी जिल्हा पर्यटन प्रसिद्धीसाठी गणपतीपुळे, कर्णेश्वर मंदिराचे फलक * सेल्फी पॉईंट, धावनगरी रत्नागिरीजवळ फोटो काढण्यास झाली गर्दी * एम फिटनेस आणि फिटनेस मंत्राच्या माध्यमातून झुंबा डान्स * सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था. Huge response to Konkan Coastal Marathon
गटनिहाय गुणानुक्रमे निकाल पुढीलप्रमाणे
२१ किमी –
१६ ते ३५ वयोगट- पुरुष- विवेक मोरे, सिद्धेश बारजे, विशाल कंबिरे, जगदीश सिंह, नीलेश कुळ्ये, अनिकेत कुटरे महिला- आकांक्षा शेलार, प्रमिला पाटील, रोहिणी पाटील, सीमा राठोड, निशा कुडले, अमिशा मांजरेकर.
३६ ते ४५ वयोगट- पुरुष- प्रसाद आलेकर, सागर घोले, डॉ. तेजानंद गणपत्ये. महिला- लथा रविचंदर, विभावरी सप्रे, कविता जाधव.
४६ ते ५५ वयोगट- पुरुष- गुरुमुर्ती नायक, अनंत तानकर, नितीन करंजकर. महिला- विजया भट, स्वाती संघवी, लिलानवर चौहान.
५६ ते ६५ वयोगट- पुरुष- अलेक्स कोइलहो, सुरेश वेलणकर, जितेंद्र सुर्वे. महिला- कोरिना डॅम, क्रांती साळवी, नीलम वानरसे.
६५ वर्षांवरील गट- पुरुष- हेमंत भागवत, अनंत क्षिरसागर, कॅप्टन प्रमोद साळवी. महिला- किशोरी कुडेचा.
१० किमी-
१६ ते ३५ वयोगट- पुरुष- अमेय धुळप, अभिनय घुरे, आदित्य धुळप, तुषार लोंढे. महिला- हेमांगी देसाई, कामिनी कार्लेकर, युगंधरा मांडवकर, रेणुका कांबळे.
३६ ते ४५ वयोगट- पुरुष- चैतन्य उप्पीन, साजिद शेख, धनंजय रुपनर. महिला- मनस्वी गुडेकर, सोनाली खानविलकर, संपदा खातू.
४६ ते ५५ वयोगट- पुरुष- सुहास आंब्रेले, संतोष महाकाळ, प्रशांत दाभोळकर, केवल बारगोडे. महिला – निशिगंधा नवरे, सायली निकम, धनश्री जोशी. ५६ ते ६५ वयोगट- पुरुष- प्रवीण कुलकर्णी, काशिनाथ पाटील, नवीन जोशी. महिला- अनिता पारेख, विद्या चव्हाण, शिल्पा बन्साली,
६५ वर्षांवरील गट- पुरुष- सतिश दीपनिक, चंद्रकांत धुरी, जयंत माजिरे. महिला- दक्षा कन्विय
५ किमी-
१६ ते ३५ वयोगट- पुरुष-यश शिर्के, श्रेय मांडवकर, संदेश सोरटे. महिला- शिवानी मासये, साक्षी पांचाळ, दीपाली भोजे.
३६ ते ४५ वयोगट- पुरुष- रणजित पवार, सचिन चौगुले, राजकमल उपाध्याय. महिला- नीलम ओसवाल, शुभांगी तहसीलदार, रिता संत्रा.
४६ ते ५५ वयोगट-पुरुष- बरून संत्रा, योगेश गंगावणे, विश्वास जाधव. महिला- मानसी मराठे, सत्या यादव, रश्मी सावंत.
५६ ते ६५ वयोगट- पुरुष- नारायण पाटाळे, प्रतापसिंग शिर्के, पूर्णसिंग मेहरा. महिला- वीणा गोगटे, सुनीता फुटाणे, सुषमा राणे.
६५ वर्षांवरील वयोगट- पुरुष- गजानन भातडे, अशोक काटकर, अविनाश भाटकर. महिला- प्रतिभा मराठे, शुभांगी देवरुखकर, सविता काटकर. Huge response to Konkan Coastal Marathon