संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका नाभिक समाजाची सन २०२४ मधील पहिली सभा नुतन वर्षाचे प्रारंभी सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी हेदवी येथे श्री.शेखर वसंत पवार यांचे निवासस्थानी उत्साहात संपन्न झाली. सभेची सुरुवात तालुका अध्यक्ष श्री.विनायक यशवंत जाधव, उपाध्यक्ष श्री.दिनानाथ मारुती कदम, सचिव श्री.संदिप मदन साळूंखे यांचेसह समाज बांधवांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दिप प्रज्वलन करुन प्रतीमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. Meeting of Nabhik Samaj Sangathan concluded

यावेळी सचिव श्री.संदिप साळूंखे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. महाराष्ट्र राज्य सरकारने नाभिक समाजातील सलून कारागीरांसाठी श्री.संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळाची स्थापना केली. त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.उदय सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच गुहागर तालुका नाभिक समाज संघटनेचे अनेक वर्षांचे समाज मंदिर बांधण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शृंगारतळी येथे जागा घेण्याबाबत श्री.मनोहर पवार गुरुजी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. Meeting of Nabhik Samaj Sangathan concluded
त्यानंतर विश्वकर्मा योजना तसेच श्री.संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळाबाबत तसेच सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेला ३० समाज बांधव उपस्थित होते. पुढील सभा १८ मार्च २०२४ रोजी वेळणेश्वर येथे श्री.स्वप्निल मनोहर कलमकर यांचे निवासस्थानी घेण्याचे निश्चित करण्यात आले. शेवटी सचिव श्री.संदिप साळूंखे यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली. Meeting of Nabhik Samaj Sangathan concluded
