• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुडली येथे निवास एसटी थांबा व वाचनालयाचे उदघाटन

by Guhagar News
January 8, 2024
in Guhagar
103 1
0
Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali
202
SHARES
577
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 08 : कुडली येथे दिवंगत श्री.शिवराम जाधव  निवास एस.टी.स्टॉपचे उदघाटन व दिवंगत श्री.महेंद्र जाधव वाचनालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थांनी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मान्यवरांचे हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर व भारतीय बुद्ध शासन सभा तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे व धम्म संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे व सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे आणि कुडली गावातल्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेऊन कुडली गावाचा विकास हाच ध्यास घेतलेले कुडली गावचे सुपुत्र, दिवंगत श्री.शिवराम पांडुरंग जाधव यांनी आपल्या हयातीत निस्वार्थीपणे कुडली गावात रस्ते, विज, पाणी, शैक्षणिक, आरोग्य व एस.टी.सुविधा उपलब्ध करून दिल्या याची गांभीर्याने दखल घेऊन दिवंगत श्री.शिवराम पांडुरंग जाधव निवास एस.टी.स्टॉप (थांबा) उदघाटन सोहळा व सुपूत्र दिवंगत श्री.महेंद्र शिवराम जाधव यांनी वडिलांचा वारसा पुढे जोमाने चालवत कुठचीही अपेक्षा न ठेवता कुडली गावातील जनतेच्या सेवेसाठी लागेल तो गाडी खर्च करून सन २०१९ मध्ये कोरोना काळात आजारी रुग्णांना रत्नागिरी व गुहागर येथे रुग्णालयात ने – आण करुन व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून समाजसेवेचे व्रत जोपासत एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. या कार्याची दखल घेऊन दिवंगत श्री. महेंद्र शिवराम जाधव वाचनालय उदघाटन सोहळा  व कुडली नं.४ या शाळेतील विद्यार्थी व  विद्यार्थिनींचा गुणगौरव सत्कार सोहळा मान्यवरांचे उपस्थितीत नुकताच उत्साहात संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पंचशील बुद्ध विहार कुडली या बुद्ध विहाराचे अध्यक्ष श्री.संजय जाधव होते. Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

कार्यक्रमाचे प्रारंभी जेष्ठ समाजसेवक श्री.शिवराम पांडूरंग जाधव यांच्या तैल चित्राला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर कुडली येथील दिवंगत शिवराम पांडूरंग जाधव निवास एस.टी.स्टॉप (थांबा) या फलकाचे उदघाटन कुडली ग्रा. सरपंच सौ.चैताली शेट्ये यांच्या शुभहस्ते व  मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते दिवंगत महेंद्र शिवराम जाधव वाचनालयाचे उदघाटनही उत्साहात संपन्न झाले.  Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

यावेळी कुडली नं.४ या शाळेतील कु.दिव्या दिपक कांबळे, कु.अर्पण भरत जाधव, कु.श्रावस्ती जितेंद्र जाधव, अस्ती प्रबोध जाधव, तन्वी विनायक जाधव, आदिती राजेंद्र जाधव, आर्यन महेंद्र जाधव, स्वागता कृष्णा वणे या विद्यार्थांनी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मान्यवरांचे हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा व विविध गावातून आलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात खास करुन आबलोली गावचे सुपुत्र श्री.विद्याधर राजाराम कदम उर्फे आपला कदम यांनी आता पर्यंत ९५ वेळा रक्तदान केले याची दखल घेऊन जाधव कुटुंबीयांच्या वतीने श्री.सखाराम सुर्वे यांचे शुभहस्ते आप्पा  कदम यांचा शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

यावेळी सरपंच सौ.चैताली शेट्ये, आबलोलीचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.आप्पा कदम, कुडली शाळा नं.४ च्या मुख्याध्यापिका श्रीमती.माधवी पाटील, भारतीय बुध्द सासन सभा या धम्म संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री.सखाराम सुर्वे, पंचशिल बुध्द विहाराचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संजय जाधव या मान्यवरांनी‌ दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव व दिवंगत महेंद्र शिवराम जाधव यांच्या जिवन कार्यावर मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी विचार पिठावर सरपंच सौ.चैताली शेट्ये,आप्पा कदम, सखाराम सुर्वे, माधवी पाटील, संजय जाधव, संतोष सावंत, आनंद जाधव, ग्रामसेवक श्री.हरिष कुळये, दत्ताराम थोरसेमान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संतोष सावंत, श्री.आनंद जाधव यांनी केले यावेळी गुहागर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, महिला, बंधू, भगिनी बहूसंख्येने उपस्थित होत्या.  Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Niwas ST Stop & Library at KudaliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.