• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुवारबाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम

by Guhagar News
January 6, 2024
in Ratnagiri
72 1
2
Annual Reunion program at Kuwarbaw
142
SHARES
406
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थ्यांना मातृभाषा, राष्ट्रीय भाषा, इंग्रजी व अन्य आंतरराष्ट्रीय भाषासुद्धा शिकवा; माने

रत्नागिरी, ता. 06 : भारतात इंग्रजीचा भरपूर पगडा आहे. परंतु मातृभाषा मराठी, राष्ट्रीय भाषा हिंदी, इंग्रजी आणि इंग्रजी व्यतिरिक्तही आंतरराष्ट्रीय भाषांचेही शिक्षण आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. आज तंत्रज्ञानामुळे व्हर्च्युअल माध्यमातूनही या भाषांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळू शकेल, असे प्रतिपादन माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब माने यांनी केले. कुवारबाव येथील श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ (पनवेल, नवी मुंबई) संचलित मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात श्री. माने बोलत होते. Annual Reunion program at Kuwarbaw

Annual Reunion program at Kuwarbaw

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. श्री. बाळ माने यांचा सत्कार श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धनराज विसपुते यांनी केला. त्यानंतर बाळासाहेब माने म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाल्यापासून पुढे आता अमृतकाळ सुरू झाला आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीचे सिंहावलोकन करून नवीन शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. गेल्या ३० वर्षांत इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. आपला देश विकसित व्हायला हवा याकरिता चांगले ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आले पाहिजे. हे जेव्हा तरुण पिढीला त्या त्या वयोगटाप्रमाणे शिकवू तेव्हा युवा पिढी अधिक सक्षम होणार आहे. अजून २५ वर्षांनी स्वातंत्र्याची शताब्दी होणार आहे. तेव्हा ही पिढी विकसित राष्ट्रासाठी योगदान देणार आहे. जगात जगण्याचा संस्कार आपण मुलांना दिला पाहिजे. Annual Reunion program at Kuwarbaw

या कार्यक्रमासाठी चेअरमन धनराज विसपुते, दि यश फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, स्कूल कमिटी सदस्या ॲड. सौ. जया सामंत, सरपंच सौ. मंजिरी पाडळकर, माध्यमिक उपशिक्षणधिकारी नरेंद्र गावंड, गटशिक्षणाधिकारी सौ. प्रेरणा शिंदे, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अजित मधाळे, संचालिका नंदा शेलार, मुख्याध्यापिका विभावरी जोईल आदींसह मान्यवर उपस्थित होते. संस्था सचिव सौ. संगीता विसपुते यांनी मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. Annual Reunion program at Kuwarbaw

सांस्कृतिक कलागुणांना जोपासणारी पालखी नृत्य, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य अशा विविध कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री जोशी, जयंत जोशी, सौ. नुपुरा मुळे, लांजा नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. यामिनी जोईल, रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, रत्नागिरी कला अध्यापक संघाचे इम्तियाज शेख, स्कूल कमिटी मेंबर विजय पुनसकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. Annual Reunion program at Kuwarbaw

Tags: Annual Reunion program at KuwarbawGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share57SendTweet36
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.