• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाळ माने यांच्या हस्ते आशासेविकांचा सन्मान

by Guhagar News
January 6, 2024
in Ratnagiri
66 0
0
Bal Mane honored Asha Sevika
129
SHARES
368
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 06 : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दक्षिण रत्नागिरी भाजपा कार्यालयात भाजपा रत्नागिरी शहर व महिला मोर्चाच्या वतीने शहरातील आशा सेविकांचा गौरव माजी आमदार व रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूकप्रमुख बाळ माने यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Bal Mane honored Asha Sevika

यावेळी उपस्थित आशासेविकांनी आपल्या समस्या मांडत त्यांना न्याय देण्याची आर्जवी मागणी केली. आशासेविका म्हणून काम करताना ऊन, पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता काम करावे लागते. परंतु या कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यल्प आहे. त्यामुळे होणाऱ्या त्रासाचे योग्य मूल्यमापन होत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. Bal Mane honored Asha Sevika

या वेळी बाळ माने म्हणाले, “सावित्रीमाईंचे व्रत आज तुमच्या माध्यमातून चालू आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांनी जो त्रास भोगला, आज त्याच वाटेने प्रवास करताना दुर्दैवाने तुम्हालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी तुमच्या मेहनतीचे मोजमाप करू शकत नाही, पण आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी तुम्हा सर्वांच्या समस्या सरकार दरबारी मांडून त्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतो.” Bal Mane honored Asha Sevika

या मेळाव्यास आशा सेविकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा प्रियल जोशी, अनुश्री आपटे, शीतल पंडित, स्नेहा जोशी, जिल्हा सरचिटणीस वर्षा ढेकणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रुमडे, चिटणीस दिपा देसाई, रत्नागिरी (उत्तर) तालुकाध्यक्षा स्नेहा चव्हाण, माजी नगरसेविका प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, सायली बेर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा चिटणीस दादा ढेकणे, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक मनोज पाटणकर, आय. टी. प्रकोष्ठ संयोजक निलेश आखाडे, शहर चिटणीस मंदार खंडकर, शोनाली आंबेरकर, उपाध्यक्ष नितीन जाधव, सागर खेडेकर, अमित विलणकर, सचिन गांधी, तुषार देसाई, मंदार मयेकर, श्री. सावंत, श्री. आयरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन महिला मोर्चा रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस नुपूरा मुळ्ये यांनी केले. Bal Mane honored Asha Sevika

Tags: Bal Mane honored Asha SevikaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.