मनोज बावधनकर, आयुर्वेदात रक्तमोक्षणाला महत्त्व
गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी रक्तदान करा असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांनी केले आहे. Importance of Raktamokshan in Ayurveda
रक्त रक्तदान शिबिराबद्दल बोलताना मनोज बावधनकर म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहेच रक्ताची कृत्रिमरीत्या निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला आपल्याकडे महत्त्व आहे परंतु त्याहीपेक्षा जास्त महत्त्व हे रक्त मोक्षणाचे आहे. आयुर्वेदात वर्षातून एकदा रक्तमोक्षण करावे, असे सांगितले आहे. रक्त मोक्षणामुळे उष्णतेचे विचार कमी होतात त्वचारोग नियंत्रणात येतो. रक्त मोक्षणामुळे हातापायांची आग होणे पोटात आग होणे आधी पित्त वाढल्यामुळे होणारे विकार कमी होतात. आपल्या शरीरातली रक्त निर्मितीची प्रक्रिया शरीरातील रक्त कमी होते तेव्हाच होते रक्त मोक्षणामुळे ही प्रक्रिया वर्षातून एकदा होते. त्यामुळे शरीरातील यंत्रणा ठीक राहते त्याचबरोबर रक्तदाब रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी देखील रक्त मोक्षण उपयोगी पडते शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया रक्त मोक्षणानंतर वेगाने होते. त्यामुळे शरीरातील अनेक भागांपर्यंत रक्त वेगात पोचते आयुर्वेदात सांगितलेल्या या फायद्यांचा विचार केला तर आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी देखील रक्तदान उपयोगी पडते त्यामुळे वर्षभरातून एकदा प्रत्येकाने रक्तदान करावे, असे आवाहन मनोज बावधनकर यांनी केले आहे. Importance of Raktamokshan in Ayurveda