भाजपतर्फे नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
रत्नागिरी, ता. 04 : भारतीय जनता पार्टीतर्फे “नमो चषक” क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव १२ ते २६ जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. याकरिता नावनोंदणीची अंतिम तारीख १० जानेवारी आहे. प्रत्येक विधानसभा स्तरावर या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. Organized Namo Cup sports competition by BJP
यामध्ये कुस्ती, फुटबॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, धावणे स्पर्धा १०० मीटर, ४०० मीटर (अॅथलेटिक्स) या क्रीडा स्पर्धा आहेत. तसेच सांस्कृतिक विषयांत चित्रकला, रांगोळी, गीतगायन, नृत्य स्पर्धा, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा खुल्या गटात स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक विधानसभा निहाय मॅरथॉन (५ कि.मी), वॉकेथॉन (३ कि.मी), सायकलिंग स्पर्धा (१० कि.मी.) बॅडमिंटन, संगीत खुर्ची या स्पर्धा होतील. Organized Namo Cup sports competition by BJP
नमो चषक स्पर्धेची नावनोंदणी १० जानेवारीपर्यंत करता येईल. १२ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीमध्ये सर्व स्पर्धा विधानसभा स्तरावर पूर्ण करायच्या आहेत. विधानसभा स्तरावर स्पर्धा यशस्वी होण्याची जबाबदारी भाजपा आमदार, विधानसभा निवडणूक प्रमुख, युवा मोर्चा तसेच क्रीडा आघाडी यांच्यावर देण्यात आली आहे. याकरिता नियोजन बैठका भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. हृषिकेश केळकर, रत्नागिरी तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने, जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्या आहेत. स्पर्धांची अधिक माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे. Organized Namo Cup sports competition by BJP
नमो चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.