• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन मासेमारीला बंदी

by Guhagar News
January 3, 2024
in Ratnagiri
151 1
3
Perscene fishing banned in Ratnagiri district
296
SHARES
845
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 03 : पर्ससिनेट नौकेद्वारे होणाऱ्या मासेमारीला १ जानेवारी पासून बंदी आदेश लागू झाला आहे. हा बंदी कालावधी १ सप्टेंबर २०२४ पर्यंत असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २७९ पर्ससिन नौका असून या कालावधीमध्ये बेकायदेशीर मासेमारी होण्याची दाट शक्यता असते. एलईडीचा वापर होतो. हे रोखण्यासाठी मत्स्य आयुक्त विभाग सतर्क झाला आहे. गस्ती नौकेद्वारे यापुढे बेकायदेशीर मासेमारीवर विशेष लक्ष ठेऊन बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मत्स्य आयुक्त विभागाने स्पष्ट केले आहे. Perscene fishing banned in Ratnagiri district

शासनाच्या नव्या मासेमारी धोरणानुसार ही बंदी लागू झाली आहे. मासेमारी हंगामाचा कालावधी वाढवून मिळावा यासाठी पर्ससीन नौका मालकांनी महिनाभर ठिय्या आंदोलन केले होते. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. केंद्र शासनाने शाश्वत मासेमारीसाठी हे कठोर निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीवरील १ जानेवारी ते १ सप्टेंबर या कालावधीत बंदी लागू आहे. त्यानंतर १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पर्ससीन मासेमारी हंगाम असणार आहे. शासनाने अशा प्रकारे मासेमारीचा हंगाम निश्‍चित केला आहे. Perscene fishing banned in Ratnagiri district

परंतु पारंपारिक मच्छीमारांसह सर्व प्रकारच्या मासेमारीला १ जूनपासून बंदी होते. ती १ ऑगस्टला हा बंदी कालावधी उठतो. पर्ससीननेट मासेमारी आता १ जानेवारी ते १ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यांना राज्याच्या सागरी जलदीक्षेत्र असलेल्या १२.५ नॉटिकल मैलपर्यंत मासेमारी करू शकत नाही. त्यापुढे केंद्र शासनाची हद्द सुरू होते. या बंदी कालावधीत पर्ससीनद्वारे बेकायदेशीर आणि एलईडीद्वारे मासेमारी होण्याची शक्यता आहे. मत्स्य विभाग ही बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. गस्तीमध्ये वाढ केली असून परवाना अधिकाऱ्यांना बेकायदेशीर मासेमारीवर कारवाईचे आदेश दिले आहेत. Perscene fishing banned in Ratnagiri district

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPerscene fishing banned in Ratnagiri districtUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यापर्ससीन मासेमारीमराठी बातम्यालोकल न्युज
Share118SendTweet74
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.