गुहागर, ता. 27 : विमेदारांच्या उदंड सहकार्यामुळे माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा संतोष वरंडे यांनी आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे 2023/24 सालातील व्यावसायिक पाचवे एमडीआरटी पुरस्कार प्राप्त झाला आहे. सौ. वरंडे यांना अमेरिकेला होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. MDRT Award to Sneha Varande

सतत अधिकाधिक लोकांना भेटून उत्तम सेवा देताना विमा संरक्षणही वाढवून देण्यात यशस्वी झाल्याने हे शक्य झाले आहे. यासाठी मेहनत तर आहेच, पण तुमचे सर्वांचे प्रेम आणि अखंड पाठिशी असलेला आशिर्वाद यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाली असल्याचे सौ. वरंडे यांनी सांगितले. या यशात कुटुंब, वरंडे विमा सेवा सर्व सहकारी, चिपळूण शाखेचे मॅनेजर श्री. सागर देवार्डेकर आणि सर्व अधिकारी व कर्मचारी, विकास अधिकारी शशिधर कान्हेरे, एजंट होमचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. MDRT Award to Sneha Varande
