दत्त कृपा साऊंड सर्व्हिस बोऱ्या संघ उपविजेता; गुहागर फ्रेंड सर्कल कला क्रिडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळ आयोजित
गुहागर, ता. 26 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित कै. वैभव विजय आरेकर, कै. सुधर्मा मदन आरेकर, कै. संजय सुरेश वराडकर, कै. भार्गव मारुती आरेकर, कै. विलास अनाजी वराडकर यांच्या स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत श्री स्वयंभू गजानन अंजनवेल संघाने दत्त कृपा साऊंड सर्व्हिस बोऱ्या संघावर एकतर्फी मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. Guhagar Friend Circle Art Sports Competition
स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरी मध्ये दत्त कृपा साऊंड सर्व्हिस बोऱ्या संघाने दत्त सेवा वेळणेश्वर संघाचा पराभव करत तर दुसऱ्या उपांत्य फेरीत श्री स्वयंभू गजानन अंजनवेल संघाने श्री पिंपळादेवी वरचापाट संघाचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात श्री स्वयंभू गजानन अंजनवेल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारून ६ षटकांमध्ये केवळ ३४ धांवामध्ये रोखून श्री दत्त कृपा साऊंड सर्व्हिस बोर्या संघाच आव्हान ४ षटकात पूर्ण करुन चालू मोसमातील गुहागर तालुक्यात सलग तिसरे विजेतेपद पटकावले. Guhagar Friend Circle Art Sports Competition
प्रथम क्रमांकास रोख रुपये २१ हजार व चषक, तर द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील विनायक पाटील – मालिकावीर (ट्रँकसूट आणि चषक), ताबीश मनियार – उत्कृष्ट फलंदाज ( बँट आणि चषक), द्वीप मोरे – उत्कृष्ट गोलंदाज (शूज आणि चषक), तेजस धामणस्कर – उत्कृष्ट क्षेत्ररक्षक (गाँगल आणि चषक), ताबीश मनियार – षटकार किंग (हेडफोन आणि चषक), ऋतिक पारधी – प्लेयर आँफ द डे (मनगटी घड्याळ आणि चषक), ऋतिक पारधी – सामनावीर (टि- शर्ट आणि चषक), वैष्णव लोखंड – उगवता तारा ( टि शर्ट आणि चषक) यांची निवड करण्यात आली. Guhagar Friend Circle Art Sports Competition
बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, पोलिस निरीक्षक सचिन सांवत, उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश कदम, विनायक मुळे, जयदेव मोरे, फ्रेंड सर्कल कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुहास सुर्वे, विद्यमान अध्यक्ष सागर मोरे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत भोसले, खजिनदार श्री. अनराज वराडकर कायदेशीर सल्लागार श्री. मयुरेश पावसकर इतर सर्व मंडळाचे आजी-माजी खेळाडू पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धेत समालोचक म्हणून सुयोग आरेकर,राज विखारे, विक्रांत आरेकर यांनी केले. तर पंच म्हणून मितेश वराडकर, प्रथमेश पिळनकर,केतन गोयथळे, नंदकुमार वराडकर, सोहम कनगुटकर,राज डोर्लेकर ,अभिजित मोरे, यश लोखंडे यांनी काम पाहिले. Guhagar Friend Circle Art Sports Competition