गुहागर, ता. 26 : काल गुहागर मधील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार गुहागर डॉ.जैसमिन यांचे शुभ हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे श्रीफळ वाढवून मान्यवरांचे शुभहस्ते उद्घाटन व स्वागत करण्यात आले. Developed Bharat Sankalp Yatra

यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी विकसित भारत संकल्पची शपथ घेतली. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांची माहिती देणारी चित्रफित त्यावेळी नागरिकांना दाखवण्यात आली. नगरपंचायतीच्या वतीने विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले व योजनांची माहिती देण्यात आली. Developed Bharat Sankalp Yatra

विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार गुहागर डॉ.जैसमिन, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड, विकसित भारत संकल्प यात्रा चे शहरी नोडल अधिकारी योगीराज बच्चे, गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जाधव, गुहागर नगरपंचायतीचे कर व प्रशासकीय अधिकारी अमित वानखेडे, चिपळूण नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष संतोष वरंडे, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, हॉटेल व्यवसायिक संघटनेचे शामकांत खातु, माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक नगरसेविका गुहागर शहारातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सदस्य प्रतिष्ठीत नागरिक विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. Developed Bharat Sankalp Yatra

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी तर आभार मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांनी मानले. श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सादर केलेले देशभक्तीपर गीत विशेष लक्षवेधी ठरले विद्यार्थिनींचा व मार्गदर्शक शिक्षक वृदांचा सहाय्यक जिल्हाधिकारी महोदयांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपंचायत मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. Developed Bharat Sankalp Yatra
