सनातन धर्मातील सर्वोच्च पद; डॉ. शंकरानन्द योगी असे नामकरण
गुहागर, ता. 23 : रत्नागिरीतील डॉ. शंकर आनंदा लोकरे (आण्णा) यांची श्री राम जानकी मठ, जौनपुर-उत्तर प्रदेश योगी अखाडा चे संस्थापक आचार्य स्वामी राधेश्याम जी महाराज यांच्या आदेशानुसार अखाड्यातील सर्व संत-साधुंच्या एकमताने श्री श्री १००८ महामण्डलेश्वर ह्या सर्वोच पदावर निवड करण्यात आली. Election of Lokre to the post of Sri Sri 1008 Mahamandaleshwar
ह्या पदावर पोहोचण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम घ्यावे लागतात तसेच अनेक धार्मिक साधना, तप करावे लागते. संस्कृत, वेद-पुराण, गीता चे संपूर्ण ज्ञान, संस्कार आणि सामाजिक स्तरावरील उल्लेखनिय कार्य केल्यामुळे योगी अखाड्याकडून सनातन धर्मातील श्री श्री १००८ महामण्डलेश्वर या सर्वोच्च पदावर निवड करण्यात येते. तसेच योगी अखाड्याच्या मान्यतेनुसार डॉ. शंकर आनंदा लोकरे (आण्णा) यांचे श्री श्री १००८ महामण्डलेश्वर डॉ. शंकरानन्द योगी असे नामकरण करण्यात आले. Election of Lokre to the post of Sri Sri 1008 Mahamandaleshwar
डॉ. शंकर लोकरे (आण्णा) हे श्री स्वामी दत्त फाउंडेशन, पूणे संस्थापक- अध्यक्ष, श्रीकृष्ण जन्मभूमि निर्माण न्यासचे संगठन सचिव (महाराष्ट्र राज्य) तसेच या वर्षात 2023- प्राच्यविद्या शिरोमणी पुरस्कार, ज्योतिष मार्तंड सन्मान, राष्ट्रीय ज्योतिष वास्तु पुरस्कार, राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राष्ट्र गौरव सन्मान, ज्योतिष रत्न सन्मान, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सनातन धर्मातील सर्वोच्च पदावर नियुक्ती झाल्याबद्दल श्री.शंकर आनंदा लोकरे (आण्णा) यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Election of Lokre to the post of Sri Sri 1008 Mahamandaleshwar