गुहागर, ता. 21 : तालुक्यातील शृंगारतळी पेट्रोल पंपा शेजारील सृष्टी इलेक्ट्रिक दुकानाला बुधवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीने मोठी नुकसानी झाली असून सदरील आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले. Fire at an electrical shop in Sringaratali

विनायका ऑटोमोबाईल पेट्रोल पंपा शेजारीच सृष्टी इलेक्ट्रिक दुकान आहे. या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक साहित्य होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास या दुकानाला आग लागली. आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केले. लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परंतु, या आगीने काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. Fire at an electrical shop in Sringaratali
