काडवली- काजवेवाडी येथील १७ ते २४ डिसेंबर रोजी
रत्नागिरी, ता. 15 : खेड तालुक्यातील काडवली- काजवेवाडी येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. या मंदिराचे उद्घाटन जळगाव येथील उद्योजक तानसेन चौधरी, सौ. पल्लवी चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. Kadavli- Kajvewadi Hanuman Temple Restoration
काडवली काजवेवाडी येथील श्री हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प श्री हनुमान मंदिर ट्रस्ट काडवली काजेवाडी वरची या मंडळाने दोन वर्षांपूर्वी सोडला होता आणि या संकल्पनेतून श्री हनुमंतरायाची आकर्षक व कौशल्यपूर्ण मंदिर रुपी वास्तूची निर्मिती पूर्णत्वास आली आहे. या अलौकिक मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जय हनुमान मंदिर ट्रस्ट काडवली काजवेवाडी वरची यांनी केले आहे. Kadavli- Kajvewadi Hanuman Temple Restoration
रविवारी दि. १७ रोजी सकाळी ९ ते १ वाजता वास्तूशांती मूर्तीचे ध्यान संचय, मूर्तीचे जलसंचय, दुपारी २.३० ते ६ वाजता हुमणेवाडी दत्तमंदिर ते काजवेवाडी हनुमान मंदिरापर्यंत कलश मिरवणूक, रात्री ७ ते ८.३० वाजता हरिपाठ होईल.
सोमवार दि. १८ रोजी सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत पुण्यवाचन नंदीश्राद्ध, देवतास्थापना, होमहवन, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत कलशारोहण- ह. भ. प. भारती महाराज (देवाची आळंदी), दुपारी २.३० ते वाजेपर्यंत हनुमान मंदिराचे उद्घाटन व सत्कार समारंभ होईल. सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ वा. देवाची आळंदी येथील ह. भ. प. भारती महाराज यांचे कीर्तन होईल. रात्री १०.३० ते १ वाजेपर्यंत ‘सैतानी फासा’ नमन होईल.

उद्घाटन व सत्कार समारंभ यावेळी आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा लांबे, काडवलीच्या सरपंच सौ. भक्ती महाडिक, उपसरपंच रोहित आग्रे, रामवरदायिनी देवस्थान मंडळ चारगावचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, सचिव राजेंद्र महाडिक, शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष सौ. मानसी महाडिक, कु. हेरंब चौधरी, कु. जानकी चौधरी, राजाराम काजवे, राजेंद्र तांबे, पोलीस पाटील राकेश मांजरेकर, मनोहर आदवडे, उद्योजक रवींद्र खाडे, पत्रकार संतोष सावर्डेकर, नितीन निकम, सुरेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Kadavli- Kajvewadi Hanuman Temple Restoration
गुरुवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत श्रींची स्थापना व भजन, सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ वाजेपर्यंत छबिना, तिवरे येथील ह. भ. प. संजय साळवी यांचे कीर्तन होईल. रात्रौ ११ नंतर जागर होणार आहे.
शुक्रवार दि. २३ रोजी पहाटे ४.३० वाजता काकडा आरती, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ छबिना, रात्रौ ९ ते ११ वाजेपर्यंत ह. भ. प. रोहित आग्रे यांचे कीर्तन तर रात्रौ ११ नंतर जागर होणार आहे.
रविवार दि. २४ रोजी पहाटे ४.३० ते ६ वाजता काकडा आरती, सकाळी १० ते ११ काल्याचा कार्यक्रम, सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ होईल. Kadavli- Kajvewadi Hanuman Temple Restoration
