• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चित्रपट निर्मितीसाठी शासकिय पाठबळ देणार

by Guhagar News
December 14, 2023
in Ratnagiri
46 1
0
Konkan Film Festival in Ratnagiri
91
SHARES
259
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बाळ माने; सिंधुरत्न कलावंत मंचतर्फे कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी, ता. 14 : कोकणातील अप्रतिम सृष्टीसौंदर्यामुळे चित्रपट निर्मिती रत्नागिरीमध्ये होणे गरजेचे आहे. महोत्सवामुळे चित्रपट निर्मितीतील कोकणातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्मिती करणारे स्थानिक कलाकारांना रोजगार मिळणार असेल तर आपण शासकीय पातळीवरच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासनापर्यंत पाठपुरावा नक्की करू, असे आश्वासन माजी आमदार बाळासाहेब माने यांनी दिले. Konkan Film Festival in Ratnagiri

Konkan Film Festival in Ratnagiri

गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि सिंधुरत्न कलावंत मंच आयोजित कोकण चित्रपट महोत्सवाच्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा महोत्सव झाला. त्यावेळी मान्यवर आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाळासाहेब माने यांनी मनोगत व्यक्त करताना या महोत्सवाचे कौतुक केले. या वेळी प्रकाश जाधव यांनी आपण स्वतः रत्नागिरीतील असल्यामुळे रत्नागिरीत दोन चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच अनेक मुळचे रत्नागिरीचे परंतु आता मुंबईत स्थायिक झालेले चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रत्नागिरीमध्ये चित्रपट निर्मितीसाठी येऊ शकतात. हाच मुख्य उद्देश ठेऊन अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, कार्यवाह विजय राणे यांनी सिंधुरत्न कलावंत मंचची निर्मिती केली आहे. Konkan Film Festival in Ratnagiri

कोकण चित्रपट महोत्सव अनेक मान्यवरांना एकत्र करण्यासाठी आयोजित केला आहे. या वेळी रत्नागिरी फिल्म क्लबचे श्री. मुळे यांनी क्लबतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात, याची माहिती दिली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी आभार मानले. रत्नागिरी जिल्हा चित्रपट महोत्सवाचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी विद्यार्थी, कलाकार, चित्रपट व्यवसायातील मान्यवर आणि स्थानिक प्रतिष्ठित लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. Konkan Film Festival in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkan Film Festival in RatnagiriLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share36SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.