• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रा. उमराठ तर्फे शेतकरी प्रशिक्षण शिबीर

by Guhagar News
December 12, 2023
in Guhagar
92 1
0
Farmer Training Camp at Umrath
181
SHARES
518
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उमराठ हा सेंद्रीय शेती उत्पादक गाव म्हणून उदयास येणार; जनार्दन आंबेकर

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील मौजे उमराठ येथील नवलाई देवीची सहाण येथे शनिवार दि. ९.१२.२०२३ रोजी ग्रामपंचायत उमराठ तर्फे पारंपरिक कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात मार्गदर्शक म्हणून गुहागर ऑर्गनिक प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोशी, नियंत्रण निरिक्षक (इन्स्पेक्टर) तेजस तेलगडे, सुरज पालकर, संकेत रावणंग, साहिल बेंडल आणि ईशान कळझुनकर लाभले होते. सुरुवातीला सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मंदार जोशी आणि सहकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपले मनोगत व्यक्त करून शिबीराची सुरूवात केली. Farmer Training Camp at Umrath

Farmer Training Camp at Umrath

ग्रामपंचायत उमराठच्या माध्यमातून ग्रामपंचायत उमराठच्या कार्यक्षेत्रातील उमराठ आणि उमराठ खुर्द या दोन्ही महसुली गावांतील प्रत्येकी २० ते २५ शेतकऱ्यांच्या गटाचे श्री देव भराडा सेंद्रिय उत्पादक गट, श्री नवलाई सेंद्रिय उत्पादक गट, वनराई सेंद्रीय उत्पादक गट आणि देवराई सेंद्रिय उत्पादक गट असे चार सेंद्रीय उत्पादक गट काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. या चारही गटांतील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा मध्यंतरी गुहागर कृषी विभागातर्फे दापोली कृषी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आला होता. Farmer Training Camp at Umrath

Farmer Training Camp at Umrath

त्यानंतर आता पारंपरिक कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मंदार जोशी आणि त्यांच्या सहकारी टीमने पारंपरिक शेती म्हणजे काय? पारंपरिक शेती मध्ये आढळणारे दोष दूर करत नापीक होत चाललेल्या जमीनीला पुन्हा सुपीक बनवण्यासाठी सेंद्रिय शेती कडे वळले पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि अधिक उत्पादन कसे घेतले पाहिजे, याबाबत महत्वपुर्ण उपयोगी असे सविस्तर मार्गदर्शन पहिल्या सत्रात केले. Farmer Training Camp at Umrath

तर दुसऱ्या सत्रात जमिनीचा कस (उत्पादन क्षमता) वाढवण्यासाठी देण्यात येणारी सेंद्रिय खतां(टॉनिकां) पैकी जीवाअमृत जैविक(टॉनिक) शेतकऱ्यांनी स्वतः कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षणात उमराठच्या सुमारे ४०/५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिला शेतकऱ्यांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता. सदर शेतकरी प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी उमराठच्या माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, सर्व सेंद्रिय गटाचे अध्यक्ष, सचिव, पोलीस पाटील वासंती आंबेकर तसेच ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व उपसरपंच सुरज घाडे यांनी मोलाचे सहकार्य केले. समारोप प्रसंगी शेवटी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्व मार्गदर्शक आणि शेतकऱ्यांना धन्यवाद देऊन आभार मानले. Farmer Training Camp at Umrath

Tags: Farmer Training Camp at UmrathGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.