गुहागर, ता. 12 : श्री सद्गुरू कचरनाथ स्वामी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने श्री कचरनाथ महाराज मठ भाविक सेवा मंडळ रेवानदी (गुहागर) येथे प्रतिवर्षीप्रमाणे सोमवार दि. 18/12/2023 रोजी वर्ष 34 वे चंपाषष्ठी सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक बंधू भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. Champashashti celebration at Guhagar Rewanadi
चंपाषष्ठी सोहळ्यानिमित्त रविवार दि. 17 रोजी स. 5 ते 5.30 वा. काकड आरती, स. 7.30 ते 8.30वा. कचरनाथ बाबांच्या पादुका पूजन व अभिषेक, स. 9 ते 10 वा. होमहवन, स. 10.30 ते 12 वा. ग्रंथपारायण, दु. 12 ते 12.30 वा. आरती, दु. 1 ते 2.30 वा. महाप्रसाद, रात्रौ 10 वा. स्थानिक भजन. सोमवार दि. 18 रोजी स. 5 ते 5.30 वा. काकड आरती, स. 9 ते 10.30 वा. कचरनाथ बाबांची दिंडी (जुना दरबार सांगळे यांच्या घरातून मठापर्यंत) स. 10.30 ते 12.30 वा. गाण्याचा कार्यक्रम, दु. 12 .30 ते 1 वा. आरती, दु. 1 ते 2.30 वा. महाप्रसाद, सायं. 3 ते 6 वा. महिलांचा हळदी कुंकू समारंभ, सायं. 7 ते 8 वा. आरती असे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. तरी सर्व भाविक बंधू भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अशी विनंती कचरनाथ महाराज मठ भाविक सेवा मंडळ रेवानदी यांचेकडून करण्यात आली आहे. Champashashti celebration at Guhagar Rewanadi

गुहागर रेवानदी येथील श्री कचरनाथ महाराज मठात दरवर्षी गुरु पौर्णिमा, चंपाषष्ठी, दत्तजयंती, पुण्यतिथी 23 फेब्रुवारी, दर महिन्यातील पहिल्या सोमवारी आरती दुपारी 12.30 ते 1 वा., दर सोमवारी सेवा स. 9.30 ते 2 हे वार्षिक कार्यक्रम करण्यात येतात. Champashashti celebration at Guhagar Rewanadi
